शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

मिशन विधानसभा! अनेकांना पक्षांतराचे वेध, तर काहींना तिकिटाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 4:32 AM

युतीच्या निर्णयावर ठरणार अनेक गुणाकार : पक्ष बदलण्याची शक्यता अधिक, अनेक जण तळ्यात-मळ्यात

मनोज मुळेय ।

रत्नागिरी : विद्यमान आमदार हेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असणार हे निश्चित असले तरी, त्यातील काहींचे पक्ष बदलणार आहेत. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या असल्या तरी जिल्ह्यात अजून निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नाही. जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली असे पाच विधानसभा मतदार संघ आहेत. २0१४ साली राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी, रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत, चिपळूणमध्ये शिवसेनेचे सदानंद चव्हाण, गुहागरात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम विजयी झाले.

पाचपैकी तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असे चित्र २0१४ साली विधानसभा निवडणुकीत दिसले असले तरी त्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले. शिवाय, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेनेच सर्वाधिक मते घेतली. त्यामुळे आजच्या घडीला शिवसेना हाच जिल्ह्यात सर्वात सक्षम पक्ष आहे.

राजापूर, रत्नागिरी येथे शिवसेनेचा बोलबाला आहे. चिपळूणमध्ये गतवेळी सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्यासमोर केवळ ६0६८ मतांची, तर दापोलीत संजय कदम यांना सेनेच्या सूर्यकांत दळवी यांच्यासमोर ३,७८४ मतांची आघाडी मिळाली होती. याहीवेळी या दोन ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित आहे. सध्या अनेक नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहे. राजापूरमध्ये राष्ट्रवादीकडून तिकिटाची अपेक्षा करणारे अजित यशवंतराव काँग्रेसकडूनही इच्छुक आहेत. रत्नागिरीत एक बडा लोकप्रतिनिधी शिवसेनेतून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी खासदार विनायक राऊत यांनी आस्थेवाईकपणे केलेली चर्चा राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकते. दापोलीत सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. आता त्यांच्याजागी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्याशी भाजप विशेष संपर्कात आहे. अर्थात शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तरच त्या चर्चा अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतील, हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील पाचही मतदार संघात हे असे काहीसे अस्थिर वातावरण आहे. शिवसेना हा सक्षम पक्ष असला तरी भाजपने सर्व मतदार संघात लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठीच दमदार नेते पक्षात घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता खूप मोठ्या प्रमाणात ढेपाळली आहे. सद्यस्थितीत गुहागर आणि दापोली या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने तेथे या दोन पक्षांची ताकद आहे. मात्र, तेथेही शिवसेना प्रबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला येत्या विधानसभा निवडणुकीत फार मोठी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. युती झाली तर युती विरूद्ध काँग्रेस आघाडी असे पारंपरिक चित्र दिसेल. मात्र युती झाली नाही तर आयात नेत्यांच्या ताकदीवर भाजपकडून शिवसेनेला जोरदार टक्कर दिली जाईल.गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवार : शिवसेना १, भाजप २, राष्ट्रवादी १, काँग्रेस १सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा ५ : शिवसेना ३, राष्ट्रवादी २सर्वात मोठा विजयरत्नागिरी : उदय सामंत (शिवसेना) मते - ९३,८७६(पराभव : बाळ माने, भाजप)सर्वात कमीमताधिक्याने पराभवदापोली : सूर्यकांत दळवी - (शिवसेना) ३७८४(विजयी : संजय कदम - राष्ट्रवादी)

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना