शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
4
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
5
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
6
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
8
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
9
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
10
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
11
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
12
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
13
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
14
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
15
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
16
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
17
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
18
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
19
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
20
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं, नगराध्यक्षपद कुणाला, काँग्रेसला किती जागा?.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:03 IST

Local Body Election: अनेकांचे पत्ते कट? मनसेचे काय?

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार उद्धवसेनेला १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा देण्याचे निश्चित झाले आहे, तर राष्ट्रवादी आपल्या वाट्यातील काही जागा काँग्रेसला देणार आहे.निवडणूक जाहीर हाेऊन पंधरवडा उलटला तरी महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू हाेती. नगराध्यक्ष पदासह जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी सर्व पक्षांनी जाेर लावला हाेता. त्यामुळे महाविकास आघाडीचं घाेडं अडलेलं हाेतं.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या बैठका सुरू हाेत्या. मात्र, शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासह १८ जागा उद्धवसेनेला, तर १४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे निश्चित करण्यात आले, तर काँग्रेसला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या हे राष्ट्रवादी काँग्रेस ठरवणार आहे.

अनेकांचे पत्ते कट?महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले होते. आता महाविकास आघाडी झाल्याने अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

नगराध्यक्ष पद उद्धवसेनेलानगराध्यक्षपदासाठी उद्धवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. उद्धवसेनेने आधीच नगराध्यक्षपदावर दावा करून उमेदवार निश्चित केला हाेता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्नीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला हाेता. मात्र, महाविकास आघाडी झाल्याने उद्धवसेनेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले.

काँग्रेसला किती जागा?जागावाटपात राष्ट्रवादी आपल्या वाट्यातील काही जागा काँग्रेसला देणार आहे. मात्र, किती जागा दिल्या जाणार हे अद्याप ठरलेले नाही.

मनसेचे काय?महाविकास आघाडीने या निवडणुकीत मनसेला आपल्यासाेबत घेतलेले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मनसे आघाडीसाेबत राहणार की, अन्य पर्याय निवडणार हे गुलदस्त्यातच आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Maha Vikas Aghadi seat sharing finalized; Shiv Sena gets Mayor post.

Web Summary : In Ratnagiri, Maha Vikas Aghadi finalized seat sharing: Shiv Sena (Uddhav) gets 18 seats and Mayor post, NCP 14. NCP will allocate seats to Congress. Many aspirants face disappointment.