विधानसभा निवडणुकीसाठी सुधारित मतदान केंद्रांची यादी
By Admin | Updated: October 4, 2014 23:41 IST2014-10-04T23:40:59+5:302014-10-04T23:41:54+5:30
सार्वत्रिक निवडणुकीसाठी

विधानसभा निवडणुकीसाठी सुधारित मतदान केंद्रांची यादी
रत्नागिरी : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१च्या कलम २५ उपबंधानुसार सुधारीत मतदान केंद्रांची यादी विधानसभा मतदार संघनिहाय नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
येत्या १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम २५ उपबंधानुसार, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या ३० सप्टेंबर २०१४च्या मान्यतेने मतदान केंद्राच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हा बदल रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या मतदारसंघात करण्यात आला आहे.
नागरिकांना या बदलाची माहिती व्हावी, यासाठी ही सुधारीत मतदान केंद्रांची यादी जिल्हा निवडणूक अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा मतदार संघनिहाय नुकतीच जाहीर केली आहे. सहायकारी मतदान केंद्रातील बदलाचीही यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केली आहे.
गुहागर विधानसभा मतदार संघातील २६० मासू बुद्रुक हे मतदान केंद्र जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मासू नं. १ येथे राहणार असून मतदान केंद्राचे क्षेत्र मास्करवाडी, नवीन फौजदार वाडी, नाचरेवाडी, तळ्याचीवाडी, जुनी फौजदारवाडी हे आहे. २६० अ मासू खुर्द हे मतदान केंद्र जिल्हापरिषद प्राथमिक शाळा मासू नं.२ येथे असून मतदान केंद्राचे क्षेत्र जाधववाडी, पवारवाडी, कातळवाडी, चाचेवाडी, वडाचीवाडी, खांदेवाडी, सातवीणवाडी आदी असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कळवले आहे.(प्रतिनिधी)
चिपळूण विधानसभा मतदारसंघातील २५६ कोसुंब मतदान केंद्रातील रत्नागिरी जि.प.मराठी शाळा, करंबेळेऐवजी जिल्हा परिषद आदर्श शाळा कोसुंब पूर्वेकडील खोली क्र.१, २७५ देवरुख मतदान केंद्रातील रत्नागिरी जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा, देवरुख क्र.२ ऐवजी पश्चिमेकडील खोली क्र.१ येथे केंद्र राहील.
निवडणूक आयोगाने दिलेल्या मान्यतेने हा बदल करण्यात आला आहे. लांजा गोंडेसखल मतदान केंद्रातील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.५ शिक्षक भवन हे मतदान केंद्र आता जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.५ उत्तर बाजूची पूूर्वेकडील खोली येथे राहील, १३१ पाचल मतदान केंद्रातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा पाचल क्र.१ ऐवजी जिल्हा परिषद उर्दूशाळा, १४८ साटवली मतदान केंद्रातील जिल्हापरिषद उर्दू शाळा ऐवजी उर्दू शाळा, साटवली नवीन इमारत उत्तरेकडील खोली येथे मतदान केंंद्राचे ठिकाण राहील. या बदलाची संबंधित मतदारसंघातील मतदार, उमेदवार व राजकीय पक्षांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले
आहे.
निवेंडी शितपवाडी मतदान केंद्रातील नवजीवन विद्यामंदिरऐवजी नवजीवन विद्यामंदिर शितपवाडी उत्तरेकडील खोली क्र.१, र.न.प.वार्ड क्र.८ मतदान केंद्रातील रत्नागिरी पटवर्धन हायस्कूल, कलामंदिर खोली क्र. १ऐवजी रत्नागिरी पटवर्धन हायस्कूल इमारत क्र.५ खोली क्र.१०, १९६ र.न.प.वार्ड क्र.८ मतदान केंंद्रातील रत्नागिरी पटवर्धन हायस्कूल, कलामंदिर खोली क्र. २ ऐवजी इमारत क्र.५ खोली क्र.१२, २१५ र.न.प. वार्ड क्र.९ मतदान केंद्रातील सागरी जीव संशोधन केंद्र (मत्स्यालय) तळमजलाऐवजी फिशरीज ट्रेनिंग सेंटर पेठकिल्ला पूर्वेकडील खोली, ३१६ चांदोर मतदान केंद्रातील जिल्हापरिषद रत्नागिरी मराठी शाळा चांदोर क्र.१ ऐवजी जिल्हापरिषद रत्नागिरी मराठी शाळा क्र.२ हे ठिकाण राहील.
१७ पाट मतदान केंद्रातील शारदा विद्यामंदिर जिल्हापरिषद शाळा हे मतदान केंद्र शारदा विद्यामंदिरची नवीन इमारत. करंजाणी मतदान केंद्रातील ग्रामपंचायत करंजाणीऐवजी अंगणवाडी केंद्र. गिम्हवणे या मतदान केंद्रातील ग्रामपंचायत कार्यालय, दापोली या केंद्राऐवजी जिल्हा परिषद केंद्र शाळा गिम्हवणे (पश्चिमेकडील खोली क्र.६), निगडे मतदान केंद्रातील जिल्हा परिषद मराठी शाळा, निगडे जुनी इमारतीऐवजी जिल्हा परिषद मराठी शाळा, निगडे नवीन इमारत क्र.१ पूर्वेकडील खोली क्र.१, भडवळे मतदान केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, इमारत क्र.१ खोली क्र.२ ऐवजी जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ इमारत क्र.२ खोली क्र.१ येथे मतदान केंद्र राहील.
अलसुरे मतदान केंद्रातील जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक उर्दू शाळा हे मतदान केंद्र आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे राहील, २६४ ८१ वरचा पाटतर्फे गुहागर मतदान केंद्रातील जिल्हापरिषद उर्दू शाळेऐवजी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा गुहागर क्र.२, ९२ शृंगारतळी मतदान केंद्रातील जिल्हापरिषद रत्नागिरी कोंडशृंगारतळी उर्दू शाळा, शृंगारतळीऐवजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पाटपन्हाळे, १२६ खोपी मतदान केंद्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, स्टोअर रुम या केंद्राऐवजी जीवन शिक्षण विद्यामंदिर खोपी रुम नं.३, २५९ आबलोली मतदान केंद्रातील जिल्हापरिषद मराठी शाळा नं.१ ऐवजी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा पागडेवाडी शाळा नं.२ हे ठिकाण राहील.