शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अस्तरीकरण काम उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

राजापूर : तालुक्यातील पाचल येथील तब्बल १,२०० कोटी रुपये खर्चाच्या अर्जुना पाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात ...

राजापूर : तालुक्यातील पाचल येथील तब्बल १,२०० कोटी रुपये खर्चाच्या अर्जुना पाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांमध्ये सिमेंट अस्तरीकरणाचे काम उखडले आहे. कालव्याच्या परिसरात अतिवृष्टीने पाणी साचले असून, कालवा फुटण्याचा धोका व्यक्त होत आहे.

बीएसएनएल सेवा कोलमडली

दापोली : शहरासह तालुक्यात बीएसएनएलची इंटरनेट सेवा कोलमडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे ग्राहकांची अनेक कामे प्रलंबित राहात आहेत. आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत असल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

वाहतूक कोंडी

मंडणगड : शहरीकरणाच्या समस्येने ग्रासलेल्या भिंगळोली गावात एस. टी. आगार ते दापोली फाटा या सखल भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या पावसाने पाणी साचण्याची समस्या वारंवार निर्माण होत आहे. मात्र, ग्रामपंचायत आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

साहित्य वाटप

राजापूर : तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायत आणि आरोग्य उपकेंद्राला मनसे उपतालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर यांच्याकडून वैद्यकीय साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सरपंच रामचंद्र कणेरी, पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर, ग्रामसेवक राऊत यांच्या उपस्थितीत ऑक्सिमीटर, पीपीई किट, सॅनिटायझर, आदी साहित्य देण्यात आले.

लसीकरणाला प्रतिसाद

रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील ग्रामपंचायतीने लसीकरणाच्या दुसऱ्या शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. प्रभाग क्रमांक १ मध्ये हे लसीकरण शिबिर घेण्यात आले. यात कोविशिल्डचे १०० डोस लाभार्थींना देण्यात आले. यावेळी सरपंच बाळा सुर्वे, उपसरपंच मानसी पेडणेकर, पोलीस पाटील शलाका सावंतदेसाई, सदस्य पपू पवार आदी उपस्थित होते.

रस्त्यावर पुन्हा खड्डे

दापोली : तालुक्यातील आसूद येथून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी आसूद ग्रामपंचायतीकडून हे खड्डे बुजविण्यात आले होते. परंतु, पुन्हा आता पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे.

प्राचीन मंदिराची माहिती

खेड : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील झोलाई देवी हे एक प्राचीन देवस्थान आहे. त्याची माहिती संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यात मंदिरातील वेगवेगळे सण, उत्सव, जत्रा साजरी केली जाते. याबाबतची माहिती संकलित करण्यात येणार आहे, त्यामुळे अशी माहिती असलेल्या भाविकांनी प्रवीण कदम यांच्याकडे संपर्क साधावा.

सरपंचांना मार्गदर्शन

मंडणगड : येथील पोलीस स्थानकाच्यावतीने कुंबळे पंचक्रोशीतील पोलीस पाटील व सरपंचांना नुकतेच मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कुंबळे ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस निरीक्षक गोविंद आंब्रे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

पत्र्यांना गळती

दापोली : येथील एस. टी. आगारातील प्रशासन विभागाच्या इमारतीवरील पत्रे फुटले असल्याने या विभागात गळती सुरु झाली आहे. यामुळे एक संगणकही नादुरुस्त झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडल्याने गळती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना आगार व्यवस्थापकांच्या कक्षात बसून काम करावे लागत आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील सुनील साळुंखे परिवाराच्या पुढाकाराने मुंबईतील दीप जलसेवा समितीतर्फे ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचा मोफत पुरवठा करण्यात येत आहे. कोविड आपत्ती बाधित झालेल्या ग्रामस्थांना या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. शनिवारी कौंढरताम्हाणे येथील ३३४ ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.