चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाचे कर्मचारी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:37 IST2020-09-24T15:36:50+5:302020-09-24T15:37:38+5:30
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत.

चरवेलीत बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाचे कर्मचारी रवाना
रत्नागिरी : तालुक्यातील चरवेली बसथांब्यानजिक राजेंद्र कुरतडकर यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी चरवेली येथे रवाना झाले आहेत.
रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी विहिरीतून बिबट्याचा आवाज आल्यानंतर कुरतडकर यांनी विहिरीत पाहिले. यावेळी विहिरीत बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. या बिबट्याला काढण्यासाठी वन खात्याची टीम घटनास्थळी पोहचली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पावस येथून पिंजरा मागवण्यात आला आहे.
बिबट्या विहिरीत पडल्याचे वृत्त गावात पसरताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे.