बिबट्याचे पिल्लू घरात घुसले, अन् धांदल उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 20:43 IST2019-06-27T20:42:39+5:302019-06-27T20:43:12+5:30

बुधवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात एका बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील माणसांची धांदल उडाली.

The leopard baby came into the house at ratnagiri due to rain | बिबट्याचे पिल्लू घरात घुसले, अन् धांदल उडाली

बिबट्याचे पिल्लू घरात घुसले, अन् धांदल उडाली

पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाऱ्या पावसाने पऱ्यांना पाणी आल्याने बिबट्याच्या मादीची आणि पिल्लाची ताटातूट झाली. यामुळे एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने लोकांची धांदल उडाली होती. मात्र, प्राणिमित्र प्रदीप डिंगणकर व सिद्धेश पावसकर यांनी पिल्लाला ताब्यात घेतले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले.


बुधवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात एका बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील माणसांची धांदल उडाली. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यावर असंख्य लोकांनी पिल्लू पाहण्यास गर्दी केली. तातडीने प्राणिमित्र प्रदीप डिंगणकर व सिद्धेश पावसकर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले आणि वनविभागाला कळविले. तातडीने वनपाल रवी गुरव, वनरक्षक महादेव पाटील, कुबल यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या पिल्लाला पऱ्याला पाणी असल्यामुळे अज्ञातवासात सोडण्यात आले. परंतु वीजेच्या प्रकाशाचा शोध घेत पिल्लू वस्तीत पुन्हा आले. या पिल्लाला सुरक्षित ठेवण्यात आले असून रात्री जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेऊन मादीची वाट पाहणार असल्याचे वनविभागातर्फे  सांगण्यात आले.


 विभागीय वनअधिकारी सुर्वे, परीक्षेत्र वनअधिकारी प्रियंका लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरु आहे. लांजा वनरक्षक विक्रम कुंभार, सागर रसाळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: The leopard baby came into the house at ratnagiri due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.