रत्नागिरीत वकिलाची आत्महत्या, कारण मात्र अज्ञात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:43 IST2020-07-07T13:42:32+5:302020-07-07T13:43:30+5:30
रत्नागिरीत एका वकिलाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अमेय अजित सावंत (३४) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

रत्नागिरीत वकिलाची आत्महत्या, कारण मात्र अज्ञात
रत्नागिरी : रत्नागिरीत एका वकिलाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. अमेय अजित सावंत (३४) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.
सोमवारी मध्यरात्री त्यांनी शहरातील परटवणे येथील राहत्या घरी बेडरूममधील पंख्याला गळफास बांधून आत्महत्या केली. मध्यरात्री उशिरा ही बाब लक्षात आल्यानंतर शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
सोमवारी रत्नागिरी जिल्हा बँकेतील अधिकारी संजय तुकाराम सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांचा मृतदेह शहरातील मांडवी समुद्रकिनारी आढळला होता. या घटनेनंतर रत्नागिरीकर सावरले नाहीत तोपर्यंत आणखी एका आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे.