शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

हातीवले महाविद्यालयात सुरू होणार कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST

राजापूर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड व भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून राजापूर ...

राजापूर : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड व भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून राजापूर तालुक्यात हातीवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या कोविड केअर सेंटरच्या जागेची बुधवारी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव व भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासोबत पाहणी केली.

राजापूर तालुक्यात गेले काही दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या प्रशासनाकडून रायपाटण व धारतळे येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. ओणी येथे २५ बेडचे कोविड रुग्णालय तर रायपाटण ग्रामीण रुग्णालयात ४५ ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे; मात्र भविष्यात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन व होम आयसोलेशन बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आणखी काही ठिकाणी कोविड रुग्णालये सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. राजापूर तालुक्यात प्रशासनाला अशा प्रकारे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी भाजप सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही भाजपाच्या वतीने देण्यात आली होती.

आता राजापूर शहरापासून जवळ असलेल्या हातीवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी निधी देण्याचे तर माजी खासदार नीलेश राणे यांनी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी बनसोडे व तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बुधवारी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, अ‍ॅड. सुशांत पवार, मोहन घुमे, अरविंद लांजेकर यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. याप्रसंगी हातीवले तलाठी सुरेश डकरे, विखारे गोठणे, पोलीस पाटील संजय पावसकर, महाविद्यालयाचे संतोष मयेकर आदी उपस्थित होते.