अपघातानंतर कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; काही गाड्या रद्दच होणार

By मनोज मुळ्ये | Updated: October 1, 2023 10:24 IST2023-10-01T10:23:23+5:302023-10-01T10:24:07+5:30

शनिवारी पनवेल येथे मध्य रेल्वेच्या मालगाडीचे डबे घसरले. ते बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे

Konkan Railway traffic disrupted; Some trains will be cancelled | अपघातानंतर कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; काही गाड्या रद्दच होणार

अपघातानंतर कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत; काही गाड्या रद्दच होणार

मनोज मुळ्ये

रत्नागिरी : पनवेलनजीक घसरलेल्या मालगाडीमुळे कोकण रेल्वे वाहतुकीला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कटले आहे, तर काही गाड्या रद्दच करण्याची वेळ आली आहे.

शनिवारी पनवेल येथे मध्य रेल्वेच्या मालगाडीचे डबे घसरले. ते बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र त्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकाला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्या स्थानकांमध्ये थांबवूनच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेळापत्रक बिघडले आहे. काही गाड्या रद्दच कराव्या लागणार आहेत. त्याबाबत निर्णय तासभरातच रेल्वे प्रशासन घेणार आहे.

Web Title: Konkan Railway traffic disrupted; Some trains will be cancelled