कोकण रेल्वेच्या ८ गाड्या रद्द, ७ गाड्यांच्या मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:36 IST2019-08-05T17:34:59+5:302019-08-05T17:36:11+5:30
मध्य रेल्वेच्या आपटा - जिते रेलमार्गावर दरड कोसळल्याने व अनेक ठिकाणी रेलमार्गावर पाणी आल्याने सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. कोकण रेल्वेने मडगाव - मुंबई मार्गावरच्या आजच्या ८ गाड्या रद्द केल्या आहेत. तर केरळहून निझामुद्दीन, चंडीगढ, पोरबंदर, अजमेर मार्गावर धावणाऱ्या गाड्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत, तर चार गाड्या उशीरा धावत आहेत. सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्याने नेत्रावती एक्स्प्रेस सोडण्यात आली. तर मडगावहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेसही सोडण्यात आली आहे.

कोकण रेल्वेच्या ८ गाड्या रद्द, ७ गाड्यांच्या मार्गात बदल
रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या आपटा - जिते रेलमार्गावर दरड कोसळल्याने व अनेक ठिकाणी रेलमार्गावर पाणी आल्याने सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. कोकण रेल्वेने मडगाव - मुंबई मार्गावरच्या आजच्या ८ गाड्या रद्द केल्या आहेत. तर केरळहून निझामुद्दीन, चंडीगढ, पोरबंदर, अजमेर मार्गावर धावणाऱ्या गाड्या अन्य मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत, तर चार गाड्या उशीरा धावत आहेत. सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्याने नेत्रावती एक्स्प्रेस सोडण्यात आली. तर मडगावहून सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेसही सोडण्यात आली आहे.
आज धावणाऱ्या दादर - सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, मडगाव - मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस, मडगाव - सावंतवाडी - दिवा पॅसेंजर, दादर - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी - मडगाव मांडवी एक्स्प्रेस, दादर - रत्नागिरी पॅसेंजर, दिवा - सावंतवाडी पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव डबल डेकर एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
३ ऑगस्ट रोजी सुटलेली एनार्कुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस पनवेल, वसई रोड, उधाना, जळगावमार्गे वळवण्यात आली आहे. ४ रोजी सुटलेली एनार्कुलम हजरत निजामुद्दीन मंगला एक्ल्प्रेस कोझरकोड, शोरनूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, रेनीगुंटा मार्गे, ४ रोजी सुटलेली एनार्कुलम - अजमेर मरुसागर एक्स्प्रेस त्रिसूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, मेलपक्कम, रेनीगुंटा मार्गे, हजरत निजामुद्दीन - थिरुवंतपूरम सेंट्रल राजधानी एक्सप्रेस नगाडा, उज्जैन, भोपाळ मार्गे, ५ रोजी सुटलेली तिरुनवेल्ली - जामनगर एक्स्प्रेस त्रिसूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, मेलपक्कम, रेनीगुंटामार्गे, कोचुवेल्ली - चंडीगढ केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस त्रिसूर, पलक्कड, सालेम, जोलारपट्टी, मेलपक्कम, रेनीगुंटा मार्गे वळववण्यात आली आहे.
३ रोजी सुटलेली कोचुवेली - चंडीगढ केरळ संपर्क क्रांती एक्स्प्रेस, कोईम्बतूर - हिसार एसी साप्ताहीक एक्सप्रेस, ४ रोजी सुटलेली मडगाव - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्प्रेस, कोचुवेली - गंगानगर साप्ताहिक एक्स्प्रेस या गाड्या उशीरा धावत आहेत.