शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
4
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
5
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
6
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
20
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?

दहावी परीक्षेत कोकण बोर्डात कॉपी प्रकरण ‘शून्य’, बारावीत मात्र..

By मेहरून नाकाडे | Updated: March 28, 2025 18:45 IST

रत्नागिरी : दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार गेल्या पाच परीक्षेत आढळलेला नाही. यावर्षीही तीच परंपरा अबाधित ...

रत्नागिरी : दहावीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार गेल्या पाच परीक्षेत आढळलेला नाही. यावर्षीही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळापैकी रत्नागिरीच्या या मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्याने रुजवली आहे. बारावी परीक्षेत रत्नागिरीत एक कॉपी प्रकाराची नोंद झाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या अंतर्गत कोकण विभागीय मंडळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सन २०१२ पासून कार्यरत आहे. सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्यामुळेच त्याचा सकारात्मक परिणाम झाला.

कोकण विभागीय मंडळाने स्थापनेपासून कायमच कॉपीमुक्त परीक्षा घेणारे मंडळ म्हणून नावलौकीक प्राप्त केले आहे. राज्यातील इतर विभागीय मंडळाशी तुलना करता कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात कोकण मंडळ आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही गैरमार्ग प्रकरण नाही. रत्नागिरीत बारावी परीक्षेत निव्वळ एकमेव गैरमार्ग प्रकार भरारी पथकाच्या निर्दशनास आला.दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समित्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे. महसूल, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची शिक्षण विभागास मोलाची साथ मिळाली. कोकण विभागात कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती रुजली असल्याचे कोल्हापूर व कोकण विभागिय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाkonkanकोकण