रत्नागिरीत गोळ्या झाडून एकाचा खून, 5 जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 08:04 IST2019-01-07T00:06:31+5:302019-01-07T08:04:24+5:30
शहरातील उद्यमनगर येथील आनंद क्षेत्री या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला.

रत्नागिरीत गोळ्या झाडून एकाचा खून, 5 जण ताब्यात
रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथील आनंद क्षेत्री या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. क्षेत्री याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू ओढवला होता. गाडीतच त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे समजते.
क्षेत्री याचा अधिकृत सावकारी व्यवहार असल्याचे समजते. तो आज रात्री पाच मित्रांसह चारचाकी गाडीतून जात असताना गाडीतीलच एकाने रिव्हॉल्वरने त्याच्यावर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. गोळी लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी संरक्षक भिंतीवर धडकली. क्षेत्री रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पाच मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.