रत्नागिरी अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी जयश्री देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 16:43 IST2020-10-30T16:41:20+5:302020-10-30T16:43:51+5:30
Police, Transfar, Ratnagirinews अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या त्या पहिल्या महिला अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत.

रत्नागिरी अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी जयश्री देसाई
रत्नागिरी : अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या त्या पहिल्या महिला अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत.
जयश्री देसाई यांनी २०१२-१३ या कालावधीत रत्नागिरी येथे परिविक्षाधिन अधिकारी म्हणून काम केले आहे. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर २०१३ ते २०१५ या कालावधीत त्या उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे कार्यरत होत्या.
त्यानंतर २०१५ ते २०१५ या कालावधीत त्यांनी जुन्नर(पुणे) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. २०१८ साली त्यांची जातपडताळणी समिती, सातारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली. त्यानंतर त्यांची पदोन्नतीने महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली.
आता पुन्हा रत्नागिरी येथे त्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. आपण यापुढे महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस देसाई यांनी लोकमतकडे व्यक्त केला.