जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 17:22 IST2022-01-12T15:58:10+5:302022-01-12T17:22:05+5:30
जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी चिपळूण तालुक्यातील कामथे दरम्यान आली असता या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला.

जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
रत्नागिरी : मुंबईहून निघालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेस गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने काेकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक बिघडले हाेते. गाडीच्या इंजिनचे काम सुरु केल्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली.
जनशताब्दी एक्स्प्रेस गाडी चिपळूण तालुक्यातील कामथे दरम्यान आली असता या गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे गाडी कामथे येथेच थांबवून ठेवण्यात आली हाेती. इंजिन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावरील अन्य गाड्या चिपळूण स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या हाेत्या.
तेजस एक्स्प्रेस ही गाडी चिपळूण येथेच थांबवून ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे प्रवाशांना ताटकळतच राहावे लागले. इंजिनचे काम झाल्यानंतर तासाभरानंतर ही गाडी मार्गस्थ करण्यात आली. दरम्यान, गाडीचे इंजिन बिघडल्याने काेकण रेल्वेचे वेळापत्रक मात्र काेलमडून गेले हाेते.