लांजात जनआशीर्वाद यात्रेचे जंगी स्वागत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST2021-08-27T04:34:50+5:302021-08-27T04:34:50+5:30

लांजा : जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे ...

Jangi will welcome Jana Aashirwad Yatra in Lanjat | लांजात जनआशीर्वाद यात्रेचे जंगी स्वागत करणार

लांजात जनआशीर्वाद यात्रेचे जंगी स्वागत करणार

लांजा

: जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता लांजा येथे येणार आहेत. यावेळी त्यांचे लांजा तालुका भाजपतर्फे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष महेश खामकर यांनी दिली. भाजप कार्यालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी लांजा शहर परिसरात सर्वच ठिकाणी शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण वातावरण हे भाजपमय झाले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे यांची जनआशीर्वाद यात्रा २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता लांजा येथे येत आहे. यावेळी लांजा शहरात लांजा तालुका भाजपतर्फे नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष महेश खामकर, नगरपंचायतीचे गटनेते संजय यादव, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, अजय गुरव, जिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये, तालुका सरचिटणीस विराज हरमले तसेच विशू जेधे, अशोक गुरव, अनिल जाधव उपस्थित होते.

Web Title: Jangi will welcome Jana Aashirwad Yatra in Lanjat