शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयचे संकेतस्थळ बंदच

By admin | Updated: July 9, 2014 23:54 IST

प्रवेश रखडला : विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

रत्नागिरी : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये राज्य शासनाच्या मान्यतेने विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. व्यायसायिक अभ्यासक्रम एक ते दोन वर्षांचे असल्याने रोजगाराची संधी उपलब्ध होईल, या आशेने विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु गतवर्षीपासून प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप आयटीआयचे संकेतस्थळ लॉक असल्यामुळे पालक, विद्यार्थीवर्ग हैराण झाला आहे. शहरातील नाचणे रोड येथे असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत १०९४ विद्यार्थी आणि १५० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. विविध प्रकारचे २५ अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. सुतारकाम, यांत्रिक डिझेल, शिवणकाम, संधाता, आरेखक स्थापत्य व यांत्रिकी, वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक उपकरण, यंत्रकारागीर, यांत्रिक मोटारगाडी, तारतंत्री, यांत्रिक प्रशिक्षण व वातानुकूलीकरण आदी १४ प्रकारच्या अभ्यासक्रमासमवेत पंप आॅपरेटर कम मेकॅनिक, कॉम्प्युटर आॅपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रॅमिंग, इंटेरियर डेकोरेशन डिझायनिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग आॅपरेटर, क्रॉफ्ट्समन फूड प्रॉडक्शन (जनरल), फ्रंट असिस्टंट, आयटीईएसएम, एमएमटीएम, फॅब्रिकेशन सेक्टर बेसीक व अ‍ॅडव्हान्स, स्टीवर्ड आदी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिवणकाम, ड्रेसमेकिंग, हेअर अ‍ॅड स्कीन, इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, फ्रूटस् अ‍ॅड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर्स आॅपरेटर अशा प्रकारचे अभ्यास क्रम शिकविण्यात येतात. सुमारे १५० विद्यार्थिनीना प्रवेश देण्यात येतो. काही अभ्यासक्रम १९६९ पूर्वी सुरू झाले आहेत, तर काही अभ्यासक्रम शासनाने २००० पासून टप्प्याटप्प्याने सुरू केले आहेत.गोरगरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी दोन वर्षात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नोकरी, व्यवसायाची संधी उपलब्ध होईल, यासाठी औद्योगिक केंद्रात प्रशिक्षण घेतात. गतवर्षीपासून अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, निकाल लागल्यापासून विद्यार्थी व पालकवर्ग आयटीआयच्या संकेतस्थळावर प्रवेश नोंदविण्यासाठी सायबर कॅफेमध्ये फेऱ्या मारीत आहेत. २६ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आले. २७ जूनपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात आले. मात्र, २७ रोजी संकेतस्थळ सुरू न झाल्यामुळे पाच जुलैपासून संकेतस्थळ सुरू होईल, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा संकेतस्थळ सुरू न झाल्यामुळे उद्यापासून (१० जून) संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे.सध्या संकेतस्थळ बंद असल्याने प्रवेशइच्छुक विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागले आहेत. गेले अनेक दिवस ही समस्या सुरू आहे.रत्नागिरी येथील आयटीआयमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांतील विद्यार्थी प्रवेश घेतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशासाठी शहराकडे यावे लागत आहे. त्यांना सातत्याने फेऱ्या माराव्या लागत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. (प्रतिनिधी)