शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणच्या महापुराचा महाअनुभव; वर्ष लोटूनही सर्वसामान्यांच्या मनात भीती

By संदीप बांद्रे | Updated: July 22, 2022 19:03 IST

केवळ ऐकताना आजही अंगावर शहारे येतात, असा अनुभव हजारो चिपळूणकरांनी घेतला, त्या गोष्टीला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जुलै २०२१. सारे होत्याचे नव्हते करणारा दिवस.

संदीप बांद्रेचिपळूण : केवळ ऐकताना आजही अंगावर शहारे येतात, असा अनुभव हजारो चिपळूणकरांनी घेतला, त्या गोष्टीला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. २२ जुलै २०२१. सारे होत्याचे नव्हते करणारा दिवस. पाऊस आला आणि त्याने काहीही न पाहता फक्त लुटून नेले. किंमत मोठी मोजावी लागली, पण आयुष्यभराचा अनुभव दिला त्या पावसाने. सगळं काही विस्कटून टाकणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी काय करायला हवे, हे या पावसाने शिकविले. सामान्य माणसाला, व्यापाऱ्यांना, प्रशासनाला, गरिबाला, श्रीमंताला, सर्वांना या पावसाने खूप काही शिकविले. ही शिकवण घेऊनच लोक पुन्हा उभे राहत आहेत.चिपळूण, खेड व लांजा या शहरांसाठी तो दिवस महाप्रलंयकारीच ठरला. चिपळूणच्या महापुरात तर तब्बल २४ तास उलटून गेले तरी कोणतीही मदत पोहोचली नव्हती. कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभा होता, कुणी तासन् तास पोटमाळ्याचा आधार घेतला होता, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभा होता, काहींनी जगण्याचीच आशा सोडली होती. शहरासह तालुक्यांतील ४८ गावांचे सुमारे १४५३ कोटींचे नुकसान करणाऱ्या या महाभयंकर जलप्रलयातून बचावलेल्या चिपळूणकरांना वर्षभरानंतरही त्या किंकाळ्या व मदतीसाठी टाहो फोडणारा आवाज आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो.वर्षभरात येथील जनजीवन कमालीच्या वेगाने पूर्ववत झाले आहे. त्याचं श्रेय जेवढं येथे तत्परतेने झालेल्या मदतकार्याला देता येईल, तितकंच हार न मानता परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या चिपळूणकरांनाही द्यावं लागेल. २०२१ चा महापूर हा चिपळूणमध्ये याआधी आलेल्या कोणत्याही महापुराच्या तुलनेत अधिक प्रलंयकारक होता. बाजारपेठ नव्हे, तर ९० टक्के चिपळूण शहर पाण्याखाली गेलं होतं. घर आणि गाळे असे व्यापाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले. महापुराच्या पाण्याने बाजारपेठेतच समुद्रसपाटीपासून तब्बल ८ ते १० मीटरपर्यंत उंची गाठली होती. चिपळूणच्या इतिहासात महापुराने प्रथमच इतकी उंची गाठली होती. आता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाच नव्हे, तर बहुतांशी इमारतीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबात महापुराची भीती वाढली आहे.या प्रसंगातून एवढा धडा मिळाला की, आपत्ती व्यवस्थापनाची दिशा कशी असावी. आपत्ती व्यवस्थापनच्या यंत्रणेत अनेक वर्षांत जे झालं नाही, ते अवघ्या एका वर्षात बदल घडलं आहे. महापुरामुळे प्रशासन आपत्ती व्यवस्थापनात सक्षम झाल्याचा महानुभव येत आहे. भविष्यात कितीही मोठी नैसर्गिक आपत्ती व संकट आले तरी ते सामना करण्यासाठी तयार असतील. चिपळूणचे प्रशासन तर तिवरे धरणफुटी, निसर्ग चक्रीवादळ आणि गतवर्षी महापूर असे सलग तीन वर्षे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करत आहेत. महाग पडला असला तरी चिपळूणच्या पुढच्या अनेक वर्षांसाठी हा धडा उपयोगी पडणार आहे.

जखम मोठी, मलमपट्टी तोकडी!महापुरात चिपळूणचे अतोनात नुकसान झाले होते. शहरासह तालुक्यातील ४८ गावांचे सुमारे १,४५३ कोटी ८० लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे जखम मोठी मलमपट्टी तोकडी अशी काहीशी स्थिती निर्माण झाली होती. तरीदेखील वरवरची मलमपट्टी का होईना शासनाने अनुदान स्वरूपात काही मदत दिली. यामध्ये पुराचे पाणी घरात घुसून नुकसान, घरांची पडझड (अंशतः व पूर्णतः नुकसान), मत्स्य व्यवसाय, कारागीर व बलुतेदार, मदत छावणी व कचरा उचलण्यासाठी एकूण ११ कोटी ४६ लाख ९ हजार ३०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी ९ कोटी २७ लाख ३३ हजार ८२६ रुपयांचे अनुदान वाटप केले

स्थलांतराचे मोठे पाऊलगतवर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी भूस्खलनच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये काही जुन्या लोकवस्तीला धोका पोहोचला. त्यामुळे यावर्षी त्या त्या गावातील कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी केले आहे. यामध्ये पेढे परशुराम ( दुर्गवाडी, ब्राम्हणवाडी), नांदगाव (डोंगबांग, सुटरवाडी), नांदीवसे (राधानगर), पेढांबे (रिंगी धनगरवाडी), मिरजोळी (जुवडबेट), कोळकेवाडी ( खरवाज, माचबौद्धवाडी), कळकवणे आदी सात गावांतील ९१ कुटुंबांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. त्यातील काही कुटुंबांचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तसेच कोयना प्रकल्प खोल्यांमध्ये केले आहे.

सार्वजनिक मालमत्ता सावरताहेतगतवर्षीच्या महापुरात चिपळूण शहरातील व्यापारी, किरकोळ दुकानदार व रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र त्या महापुरात नगर परिषद मालकीच्या व सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानाची भरपाई आजतागायत झालेल्या नाही. नगर परिषदेचे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या नाट्यगृहाचा प्रवेशद्वारच उघडलेले नाही. नूतनीकरणावर सुमारे साडेनऊ कोटींचा केलेला खर्च आज अक्षरशः वाया गेला आहे. नगर परिषदेच्या इतर वास्तू व सार्वजनिक स्वच्छता गृहाचे अजूनही दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचेही महापुरात मोठे नुकसान झाले होते. तेही आता हळूहळू सावरत आहे.

महावितरण, एसटी अडचणीतचमहापुरामुळे महावितरणचे सुमारे २ कोटींचे नुकसान झाले होते. चिपळूण शहरासह सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या गावात अतिवृष्टीने महावितरणचे प्रचंड नुकसान झाले होते. महावितरणची शहरातील मुरादपूर व खेर्डी येथील उपकेंद्रे पाण्याखाली गेली होती. तर उच्चदाब असलेले २२४ व लघुदाबचे २५६ विद्युत पोल महापुरात कोसळले होते. तसेच २५ विद्युत रोहित्र महापुरात निकामी झाले होते. आतापर्यंत ४ हजार विद्युत मीटर उपलब्ध झाले असून जुने मीटर बदलण्यात आले आहेत. परंतु थकीत रकमेमुळे महावितरण अडचणीत आले आहे. तसेच चिपळूण एसटी महामंडळाचीदेखील हीच परिस्थिती आहे. आधी महापुराने मारले, त्यानंतर कर्मचारी संपाने आणि आता अतिवृष्टीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेला नदी सवंर्धन अंतर्गत वाशिष्ठी व शिवनदीचा प्रस्ताव बंदविकास खात्यामार्फत पाठविण्यात येणार असून त्याचा पाठपुरावा करणार आहे. त्याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गाळ उपशासाठी तातडीने प्रयत्न करणार आहे. त्यासाठी निम्मी रक्कम मिळाली असून उर्वरीत निधीसाठी प्रयत्नात आहे. सरकार बदलल्याने काही अडचणी येऊ शकतात. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या कामाचा आढावा घेत असून ऑक्टोबर महिनाअखेरीस ते दौरा करणार आहेत. - शेखर निकम, आमदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा