पोटाची खळगी भरत नाही, थांबून तरी काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 01:51 PM2020-05-06T13:51:21+5:302020-05-06T13:54:28+5:30

यापैकी बोरज येथील ठेकेदार कंपनीच्या कॅम्प ऑफिसच्या परिसरात राहणाऱ्या उपठेकेदाराच्या  ८० मजुरांपैकी १५ मजूर बुधवारी पायी रेल्वे रूळाचा आधार घेत चालत जाण्याचा तयारीत असताना वेरल ग्रामस्थांच्या लक्षात आले.

It doesn't fill the stomach, what will you do if you stop? | पोटाची खळगी भरत नाही, थांबून तरी काय करणार?

पोटाची खळगी भरत नाही, थांबून तरी काय करणार?

Next
ठळक मुद्देखेडमधील आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांची केविलवाणी अवस्थाधोकादायक मार्ग पत्करून निघाले गावालाकेवळ अडीचशे रूपयावर राबत होते रस्त्याच्या कामासाठी आले होते खेडमध्ये

खेड : पोटाची खळगी भरण्यासाठी केवळ अडीचशे रुपयात दिवसभर राबणारे परप्रांतीय मजूर लॉकडाऊनमध्ये वाढलेल्या अन्नधान्याच्या किंमतीमुळे पोट भरू शकत नाहीत अशा अवस्थेत आहेत. जगणेच मुश्कील झाल्याने खेडमध्ये आलेल्या मध्यप्रदेशातील या मजुरांनी चालत गावी जाण्याचा धोकादायक मार्ग पत्करला आहे.

मुंबई - गोवा महामार्गाच्या कशेडी ते परशुराम या ४४ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी अनेक परप्रांतीय कामगार ठेकेदारांच्या माध्यमातून काम करीत आहेत. यापैकी बोरज येथील ठेकेदार कंपनीच्या कॅम्प ऑफिसच्या परिसरात राहणाऱ्या उपठेकेदाराच्या  ८० मजुरांपैकी १५ मजूर बुधवारी पायी रेल्वे रूळाचा आधार घेत चालत जाण्याचा तयारीत असताना वेरल ग्रामस्थांच्या लक्षात आले. याची माहिती ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांना दिली. या मजुरांना ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबवून ठेवले.

याबाबत या मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी सुनील गौड या ठेकेदाराने दिवसाला अडीचशे रुपयांच्या मजुरीवर ८० मजुरांना महामार्गाच्या कामासाठी आणले होते. मध्यप्रदेश राज्यातील सिधी जिल्ह्यातील हे मजूर चार महिन्यांपासून येथे काम करीत आहेत. लॉकडाऊनच्या काळात महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, दिवसभर काम करून मिळणारी मजुरी आणि रोजचा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने या मजुरांनी गाव गाठण्याचा निर्णय घेतला.

खेडपासून त्यांच्या सिधी या जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंतचे अंतर सुमारे १५०० किलोमीटर असल्याची माहिती त्यांनी दिली. गेले आठ दिवस केवळ भात व बटाटे उकडून खात असल्याची माहिती दिली. बुधवारी सकाळी हे १५ मजूर बोरज येथून महामार्गाने खेड रेल्वे स्टेशनजवळ पोहोचले. याठिकाणी ते रेल्वे रुळांचा आधार घेत पुढचा प्रवास करण्याच्या तयारीत होते.

Web Title: It doesn't fill the stomach, what will you do if you stop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.