शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा: प्रवीण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 6:02 PM

pravin darekar, Farmer, Khed, Ratnagiri अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करून ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खेड येथे केला. परभणी येथील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाची पूर्तता करावी अशी मागणी केली.

ठळक मुद्दे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून टिकाशेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वचनाची पूर्तता करावी

खेड : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करून ठाकरे सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी खेड येथे केला. परभणी येथील दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचनाची पूर्तता करावी अशी मागणी केली.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी दरेकर शुक्रवारी खेड येथे आले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेड येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी भडगाव येथे नुकसानाची पाहणी केली.यावेळी ते म्हणाले की, दहा हजार कोटींची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टा सरकारने केली आहे. जाहीर करण्यात आलेले नुकसान भरपाईचे पॅकेज फसवे आहे. यातील केवळ पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद प्रत्यक्षात शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

पॅकेजमधील जवळपास निम्मा निधी रस्ते दुरुस्ती, जलसंधारण आदी कामांसाठी देण्यात आला आहे. अशा पध्दतीने भरडलेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी आर्थिक मदत देणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो असेही त्यांनी सांगितले. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करताना जुने निकष अडचणीचे ठरतात यामुळे हे निकष बदलण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.खडसेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस टार्गेटएकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशा विषयी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी खडसेंचा निर्णय योग्य की अयोग्य हे लवकरच कळेल मात्र खडसेंचा खांद्यावर बंदूक ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप केला. खडसे कुटुंबियांना पक्षाने खूप काही दिले आहे अशीही पुस्ती यावेळी जोडली.

टॅग्स :BJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरFarmerशेतकरीKhedखेडRatnagiriरत्नागिरी