शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: December 12, 2015 00:11 IST

माध्यमिक शाळा मान्यतेच्या प्रतीक्षेत : विज्ञान, गणित इंग्रजीतून शिकविण्यास शिक्षक अनुत्सुक

मेहरून नाकाडे--रत्नागिरी  -आपल्या पाल्याला इंग्रजी संभाषण करता यावे, यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळेच आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्याही वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या १९ माध्यमिक शाळा होत्या. आता त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या ३४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात माध्यमिक शाळांची एकूण संख्या ३८८ इतकी आहे. पैकी मराठी माध्यमाच्या ३२१, इंग्रजी माध्यमाच्या ३४ आणि उर्दू माध्यमाच्या ३३ शाळा आहेत. ७ शाळा स्वयंअर्थसहाय्यित आहेत. या शाळांचे प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या शाळा मान्यतेच्या प्रवाहात येतील. त्याचप्रमाणे बृहत् आराखड्यानुसार ११ मराठी माध्यमांच्या शाळांचे प्रस्ताव शासनाच्या परवानगीसाठी पाठवण्यात आले आहेत. स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी शासनाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. माध्यमिक शाळेसाठी २०, तर प्राथमिक शाळेचे २० अर्ज प्रस्तावित आहेत. शाळेसाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी एक एकर जागा व दोन लाख रुपये इतकी अनामत रक्कम हा निकष ठेवण्यात आला होता. संबंधित निकषांची पूर्तता करीत जिल्ह्यात अजून नवीन २० माध्यमिक शाळा मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. मराठी माध्यमाच्या एकूण ३२१ माध्यमिक शाळांपैकी काही शाळांमधून सेमी इंग्रजी अध्यापन सुरू आहे. त्यामध्ये गणित व विज्ञान विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जाते. दहावीनंतर विज्ञान किंवा अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेत असताना इंग्रजी भाषेतून गणित, विज्ञान शिकवण्यात येते. कला व वाणिज्य शाखेतील काही विषय वगळता बहुतांश अध्यापन इंग्रजी भाषेतून होते. त्याचवेळी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अडसर ठरते. काही शाळांमधून सेमी इंग्रजीचे अध्यापन सुरू आहे. सेमी इंग्रजी शाळांची स्वतंत्र संख्या नाही, तर या शाळांचा समावेश माध्यमिक शाळांमध्ये करण्यात असल्याने तीच संख्या मोजण्यात येते. शिवाय अनेक शाळांमध्ये बीएससी बी. एड. किंवा एमएस्सी बी. एड.धारक शिक्षक आहेत. मात्र इंग्रजी भाषेतून विज्ञान व गणित शिकविण्यास काही शिक्षक तयार होत नाहीत. मराठीतून शिकवण्याचा हातखंडा असलेले शिक्षक इंग्रजीतून अध्यापन करण्यात कमी पडतात. त्यामुळे सेमी इंग्रजीसाठी संस्थेला स्वतंत्र शिक्षकांची नियुक्ती करावी लागत आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. ही संख्या कमी होत असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्येत मात्र वाढ होताना दिसत आहे. या शाळांना शासनाकडूनच परवानगी मिळत असल्याने मराठी शाळा वाचवा, हे धोरण कशासाठी आहे.तालुकामराठीउर्दूइंग्रजीएकूणमंडणगड१७५२२४दापोली३५५३४३खेड४५५६५६चिपळूण५५४८६७गुहागर२२३२२७संगमेश्वर३८३३४४लांजा२२११२४राजापूर४६३२५१रत्नागिरी४१४७५२एकूण३२१३३३४३८८