शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

ऐन सणात आवक घटल्याने फुलांच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 1:02 PM

Navratri, temple, Ratnagirinews नवरात्रोत्सव सुरू असल्याने घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. दररोज घटाची पूजा करण्यात येत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये झेंडू, कमळ, शेवंती, गुलाब, निशिगंधा, लीली आदी विविध प्रकारच्या फुलांना मागणी होत आहे. याशिवाय फुलांच्या माळा, वेणी, गजरे यांचाही खप होत असला तरी आवक मोठ्या प्रमाणात होत नसल्याने फुलांचे दरही वाढले आहेत.

ठळक मुद्देऐन सणात आवक घटल्याने फुलांच्या दरात वाढत्पादनावर परिणाम झाल्यास व्यवसायातही घट होण्याची शक्यता

रत्नागिरी : नवरात्रोत्सव सुरू असल्याने घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. दररोज घटाची पूजा करण्यात येत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये झेंडू, कमळ, शेवंती, गुलाब, निशिगंधा, लीली आदी विविध प्रकारच्या फुलांना मागणी होत आहे. याशिवाय फुलांच्या माळा, वेणी, गजरे यांचाही खप होत असला तरी आवक मोठ्या प्रमाणात होत नसल्याने फुलांचे दरही वाढले आहेत.नवरात्रोत्सवात श्री दुर्गामातेचे सर्वत्र पूजन करण्यात येत आहे. नऊ दिवस घटाला माळ अर्पण करण्यात येत असल्यामुळे फुलांना वाढती मागणी आहे. शिवाय उत्सव कालावधीत देवीची ओटी भरण्यात येत असल्याने सुटी फुले, हार, वेण्यांनाही मागणी होत आहे.

याशिवाय दसरा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. यादिवशी शस्त्रात्र, वाहनांची पूजा करण्यात येते. घराच्या दरवाजालाही नवधान्याच्या तोरणांबरोबर फुलांचे तोरण लावण्यात येते. त्यामुळे फुलांना विशेष मागणी होत आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने फुलशेती बहरली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे पिकांची हानी झाली. असल्याने फुलांची आवक घटली आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही झेंडू लागवड केली असून, तयार झेंडू बाजारात विक्रीला येऊ लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फुलांचे दर वाढले आहेत. दसऱ्याला खप वाढण्याची शक्यता आहे.केशरी, पिवळा झेंडू १०० ते १२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. शेवंती, निशिगंधा, लीली १०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शेवंतीची वेणी ३० ते ३५ रुपये दराने विकण्यात येत आहे. नवरात्रीपासून फुलांच्या दरात वाढ झाली आहे. दीपावलीपर्यंत फुलांना मागणी राहणार आहे. परतीचा पाऊस अधूनमधून धुमाकूळ घालत असल्याने फुलांच्या शेतीचे नुकसान होत आहे. उत्पादनावर परिणाम झाल्यास व्यवसायातही घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीRatnagiriरत्नागिरी