गुहागरात बेकायदेशीर मासेमारी; रत्नागिरी, गुजरातमधील दोन नौकांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:43 IST2026-03-18T16:42:58+5:302026-03-18T16:43:30+5:30

रात्री १० वाजण्याच्या दरम्यान कारवाई

Illegal fishing in Guhagar Two boats from Ratnagiri, Gujarat fined | गुहागरात बेकायदेशीर मासेमारी; रत्नागिरी, गुजरातमधील दोन नौकांना दंड

गुहागरात बेकायदेशीर मासेमारी; रत्नागिरी, गुजरातमधील दोन नौकांना दंड

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभासमाेर समुद्रात २० वावच्या अंतरावर बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या दोन नाैकांवर शुक्रवारी (१३ मार्च) रात्री १० वाजण्याच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या रत्नागिरीतील एलईडी मच्छीमार नाैकेला ५ लाख तर गुजरात येथील ट्राॅलिंग नाैका मालकाला ३ लाख २७ हजारांचा दंड मंगळवारी सुनावणीत ठाेठावण्यात आला.

गुहागर तालुक्याच्या समुद्रात सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाचे परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्यासह पर्यवेक्षक विनायक शिंदे आणि सुरक्षारक्षक अक्षय मयेकर आणि सहकाऱ्यांसोबत नवदुर्गा गस्ती नौकेतून शुक्रवारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना रत्नागिरीतील ए. आर. मयेकर यांच्या मालकीची श्री सद्गुरू कृपा नौका एलईडी प्रकाशात मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. दुसरी नाैका गुजरात दिव येथील ट्रॉलिंग नौका मासेमारी करताना सापडली.

या दोन्ही नौका दाभोळ बंदरात अटकावून ठेवण्यात आल्या होत्या. परवाना अधिकारी स्वप्निल मयेकर यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या न्यायालयात प्रतिवेदन दाखल केले होते.

मंगळवारी या दोन्ही नौकांसंदर्भात अभिनिर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. अभिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांनी एलईडी मासेमारी करणाऱ्या श्री सद्गुरू कृपा नौका मालक ए. आर. मयेकर यांना ५ लाख आणि गुजरातमधील नौका मालक विनोद सोळंखी यांना ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title : गुहागर में अवैध मछली पकड़ना: रत्नागिरी, गुजरात की दो नौकाओं पर जुर्माना

Web Summary : गुहागर के पास अवैध मछली पकड़ने पर दो नौकाओं पर जुर्माना लगाया गया। रत्नागिरी की एलईडी लाइट वाली नाव पर ₹5 लाख और गुजरात की एक ट्रॉलर पर ₹3.27 लाख का जुर्माना लगा। अधिकारियों ने अवैध रूप से मछली पकड़ते पाए जाने पर नावों को जब्त कर लिया। सुनवाई के बाद जुर्माना लगाया गया।

Web Title : Illegal Fishing in Guhagar: Two Boats Fined from Ratnagiri, Gujarat

Web Summary : Two boats were fined for illegal fishing near Guhagar. A Ratnagiri boat using LED lights was fined ₹5 lakh, and a Gujarat trawler ₹3.27 lakh. Authorities seized the boats after finding them fishing illegally. The fines were levied after a hearing.