..तर गुन्हा दाखल करणार, मंत्री उदय सामंतांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:04 IST2025-04-02T19:04:14+5:302025-04-02T19:04:49+5:30

कर्ज भरायलाच हवे, पण

If people are harassed for money, a case will be registered Minister Uday Samant's warning to microfinance companies | ..तर गुन्हा दाखल करणार, मंत्री उदय सामंतांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा

..तर गुन्हा दाखल करणार, मंत्री उदय सामंतांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा

रत्नागिरी : तळागाळातील गरजू लोकांना कर्ज देणा या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना छळले जात आहे. सायंकाळी ६ नंतर कोणी कर्ज वसुलीसाठी गेले तर त्यांचयावर लगेचच गुन्हा दाखल करण्याची सूचना आपण दिली आहे, असे पालकमंत्रीउदय सामंत यांनी सांगितले.

मंगळवारी मंत्री सामंत यांनी वरिष्ठ अधिका यांची एक बैठक घेतली. यात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. लोकांना छळणा या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी यावेळी दिल्या आहेत.

कर्ज भरायलाच हवे, पण

मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज फेडायलाच हवे. मात्र सकाळी ९ ते सायंकाळी ६ हीच वसुलीची वेळ आहे. त्यानंतर वसुलीला जाणा यांवर तसेच मंजुरीपेक्षा जादा व्याजदर आकारणा या कंपन्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. अनेक महिलांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ॲपेक्स कार्यकारिणी ३ एप्रिल रोजी याबाबत बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.

सात जण तडीपार होणार

जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचे प्रकार वाढत आहेत. त्याची आपण गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याविषयी कडक कारवाईचे आदेश आपण दिले आहेत. अंमली पदार्थ विक्रीत सातत्याने पुढे असलेल्या जिल्ह्यातील सातजणांच्या तडीपारीचे प्रस्ताव पोलिसांनी तयार केले आहेत. त्यांच्या तडीपारीचे आदेश लवकर द्यावेत, अशी सूचना आपण केली आहे. त्यामुळे इतरांना चाप बसेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Web Title: If people are harassed for money, a case will be registered Minister Uday Samant's warning to microfinance companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.