शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मी तुमच्यावर, तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही : सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 1:33 PM

sunil tatkare, Bhaskar Jadhav, Ratnagiri यापुढे मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही. हे दोघांनी कायम जपायचे, असा शब्द खासदार सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी चिपळूण येथे दिला.

ठळक मुद्देमी तुमच्या वर तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही : सुनील तटकरेआमदार भास्कर जाधव यांनी एकमेकांना दिला कायमचा शब्द

चिपळूण : यापुढे मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही. हे दोघांनी कायम जपायचे, असा शब्द खासदार सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी चिपळूण येथे दिला.कामथे उपजिल्हा रूग्णालयात ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन प्रणालीचा शुभारंभ खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्ताने तटकरे व जाधव हे अनेक वर्षांनी एका व्यासपीठावर आले होते.

यावेळी जाधव यांच्या हस्ते तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जाधव यांनी तटकरे माझ्यावर टोलेबाजी करतीलच पण त्यांच्याकडे यानिमित्ताने एकच मागणी करेन की, जसे खेडवर प्रेम दाखवून कार्डिया रुग्णवाहिका दिली, तशीच रुग्णवाहिका चिपळूणलाही द्यावी. चिपळूणनेही त्यांना खूप काही दिले आहे, अशी विनोदी शैलीत जाणीव करून दिली.त्यावर तटकरे यांनी आपल्या भाषणात जाधव यांची मागणी लवकरच पूर्ण होईल, असे सांगताना मी त्यांच्यावर टोलेबाजी करणार नाही. कारण जाधव यांची राजकीय वाटचाल २५ वर्षे पाहिली आहे. उलट त्यांच्या वाटेला जाण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर टोलेबाजी करण्याचा प्रश्नच येत नाही.

यावर जाधव यांनी तटकरे यांना रोखत यापुढे मीही तुमच्यावर टोलेबाजी करणार नाही. तुम्ही ते जपा असे स्पष्ट केले. त्यावर तितक्याच हजरजबाबीपणे तटकरे यांनी मी तो शब्द पाळेन, पण तुमचा भरोसा मला नाही, असे स्पष्ट करताच कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारणsunil tatkareसुनील तटकरेBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरी