शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो ब्रास वाळूची बिनधास्त चोरी

By admin | Updated: June 30, 2014 00:15 IST

मिरकरवाडा बंदर : प्रांताधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर तुडवले जातात शासकीय नियम

रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांच्या काळात रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करून बंदराशेजारी पांढऱ्या समुद्रापर्यंत ढीग रचून ठेवण्यात आला आहे. बांधकामासाठी उपयुक्त असल्याने शेकडो ब्रास वाळू (उपसलेला गाळ) ट्रकद्वारे चोरून नेण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा समस्या कायम असतानाच मिरकरवाडा बंदरातील वाळूची चोरी नेमके कोण करतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महसूल खात्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी, गुहागर, चिपळूणसह अनेक ठिकाणी अद्याप बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत फोटो वा व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांनी महसूल खात्याच्या डोळ्यात अंजन घातल्यानंतर तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. त्यानंतर जैसे थे स्थिती निर्माण होते. त्यामुळे या अवैध वाळू उत्खनन व्यवसायाला अधिकाऱ्यांचेच अभय असल्याचा आरोप होत आहे. बेकायदा वाळू उत्खननामुळे शासनाचे रॉयल्टीपोटी मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने बुडत आहे. जिल्ह्यातील वाळू उपशाबाबत ही स्थिती असताना मिरकरवाडा बंदरात मच्छिमारी नौकांना पाण्याची योग्य खोली उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे मोठ्या प्रमाणात उपसण्यात आला. ही वाळू ड्रेझरमधील सक्शन पंपद्वारे रबरी पाइपमधून किनाऱ्यावर टाकण्यात आली. त्यामुळे मिरकरवाडा बंदरापासून पांढऱ्या समुद्रापर्यंत या वाळूचा प्रचंड मोठा ढिगारा तयार झाला आहे. ही वाळू हजारो ब्रास आहे. किनाऱ्यावरील जाडसर वाळू बांधकामासाठी वापरली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या वाळूची चोरी होत आहे. पांढऱ्या समुद्राच्या बाजूने मुख्य रस्त्यापर्यंत असलेल्या वाटेने येऊन ट्रकमधून ही वाळू नेली जात आहे. येथील वाळू चोरट्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)