शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
2
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
3
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
4
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
5
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
6
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
7
नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही
8
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
9
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
10
Astro Tips: तिन्ही सांजेला 'या' ५ चुका करणे म्हणजे घरी आलेली लक्ष्मी परतावून लावणे!
11
इंडिगो संकटाची मोठी किंमत! DGCAची कठोर कारवाई, निष्काळजीपणा आढळताच ४ अधिकारी निलंबित
12
Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
14
ब्रह्मोसपेक्षा वेगवान; भारताला मिळणार 300 रशियन R-37M क्षेपणास्त्रे, सुखोई विमानात बसवले जाणार
15
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
16
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
17
अलिबागमधील आक्षी समुद्रकिनाऱ्यावर बिबट्याचा धुमाकूळ, दोन जणांवर हल्ला
18
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
19
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
20
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
Daily Top 2Weekly Top 5

महापुरातील वाहनांचे नुकसान कसे भरून निघणार; महाडमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 19:26 IST

रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली.

- सिकंदर अनवारे

दासगाव: महाडमध्ये आलेल्या महापुरात शहरातील प्रत्येक वाहन पुराच्या पाण्यात अडकले. वाहनांची पाण्याच्या प्रवाहात पडझड झाल्याने नुकसान देखील झाले. वाहनांची दुरुस्ती करण्यासाठी महाडमध्ये रांगा लागल्या आहेत. काही गॅरेज चालक फ्रि सेवा देत आहेत. महाडमध्ये आलेल्या पुराने संपूर्ण शहरात हाहाकार माजवला. यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यात जीवितहानी आणि शहरात वित्तहानी झाली आहे. शासकीय मालमत्तेचे देखील या पुरात नुकसान झाले आहे. शहरात असलेल्या वाहनांची तर पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाताहत झाली. रस्त्यावर असलेली वाहने एकमेकावर आपटली. अनेक वाहने गटारात वाहून गेली. कार आणि मोटारसायकल दोन्ही प्रकारची वाहने यामध्ये बाधित झाली.

पुराच्या पाण्यात किमान दोन दिवस ही वाहने तशीच राहिली त्यातच मोठ्या प्रमाणावर चिखल असल्याने हा चिखल वाहनांच्या विविध भागात जावून साचला. यामुळे इलेक्ट्रोनिक यंत्रणा बंद पडल्या आहेत. गाडीतील सीट कव्हर, रुफ कव्हर, हॉर्न, इंधन टाक्या, हेडलाईट, ब्रेक, ई.सी.एम, वायरिंग, सेन्ट्रल लॉकिंग, क्लच प्लेट, आदी भाग नादुरस्त झाले आहेत. त्यातच कांही वाहनांना विमा कव्हर असल्याने अनेकांनी वाहने कांही दिवस तशीच ठेवली आहेत त्यामुळे वाहनांचे अधिक नुकसान झाले आहे.

महाड शहरात साधारणपणे छ.शिवाजी चौक, काकरतळे, सुकटगल्ली, मुख्य बाजारपेठ, आदी भागात कांही प्रमाणात पुराचे पाणी येते. सन २००५ मध्ये छ.शिवाजी चौक ते एस.टी.स्थानक मार्गावर देखील साधारण एक फुट पाणी आले होते. त्यातच महाडमधील नवेनगर परिसरातील शासकीय धान्य दुकान गोदाम, महाड तहसील कार्यालय (कोट आळी), महाड एस.टी.स्थानक, छ. शिवाजी मार्ग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, चवदारतळे या परिसरात पुराचे पाणी शक्यतो येत नाही.

दरवर्षाचा हा अनुभव असल्याने यावर्षी देखील दिवसभर आलेल्या पुराच्या पाण्याआधी नागरिकांनी आपली वाहने याठिकाणी आणून ठेवली. मात्र हा अनुभव यावेळी मात्र फिका पडला. पुराच्या पाण्याने वाहनांना देखील सोडले नाही. कांहीजणांनी कर्ज काढून वाहने घेतलेली होती तर कांहीनी सेवानिवृत्त होत कुटुंबाची आवड म्हणून आवडीचे वाहन घेतले होते. प्रत्येकाने आपली गरज ओळखत वाहने घेतली मात्र आवडीच्या वाहनावर पुराने पाणी फिरवले. वाहनांची अवस्था पाहून अनेकांचे चेहरे रडवेले झाले आणि वाहनांचे हे नुकसान कसे भरून काढायचे असा प्रश्न प्रत्येकाला पडला.

वाहने घेताना आपण विमा काढलाच पाहिजे मात्र महाड मधील गेली कांही वर्षाची स्थिती पाहता सातत्याने पुराच्या पाण्यात वाहने जात आहेत. यामुळे विमा कंपन्या देखील आता येथील उत्पन्न आणि द्यावा लागणारा मोबदला याचा विचार करेल. भविष्यात आपली वाहने पूर परीस्थिती पाहता वाहन कसे सुरक्षित राहील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे – ललित खातू विमा सल्लागार महाड

वाहन पुराच्या पाण्यात गेल्याने वाहनाच्या प्रत्येक भागात चिखल गेला आहे. यामुळे संपूर्ण वाहन खोलून चिखल पाणी काढून टाकणे हे मुख्य काम आहे. वाहनातील इलेक्ट्रोनिक पार्ट यामध्ये शक्यतो खराब होतात. यामुळे नवीन टाकणे उत्तम असते. पूर्ण दुरुस्तीनंतर वाहन पुन्हा रस्त्यावर धावेल – विनोद कातरे शिंदे मोटर्स महाड

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरbikeबाईकcarकारRainपाऊस