सिलिंडरच्या स्फोटात घर जळाले; एकजण अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 22:23 IST2019-11-26T22:20:26+5:302019-11-26T22:23:30+5:30
घरात आणखी एक भरलेले सिलिंडर आणि फ्रीज असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहे.

सिलिंडरच्या स्फोटात घर जळाले; एकजण अडकला
लांजा - लांजा तालुक्यातील गोवीळ गुरववाडी येथे सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग रात्री दहा वाजल्यानंतरही धगधगतच असून अर्धांगवायूने आजारी असलेले दीपक गंगाराम गुरव घरातच अडकले आहेत.
रात्री पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने गुरव यांच्या घराला आगीने वेढले. आग लागल्याचे समजल्याक्षणी घरातील सर्वजण बाहेर पडले. मात्र अर्धांग वायूने आजारी असलेले ५५ वर्षीय दीपक गुरव आतमध्येच अडकून पडले असल्याची माहिती हाती येत आहे. घरात आणखी एक भरलेले सिलिंडर आणि फ्रीज असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहे. आसपासच्या लोकांना घरापासून लांब ठेवण्यात आले आहे.