शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 5:51 PM

Accident Ratnagiri- महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्याकरिता योजना

आबलोली : महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना उपचाराकरिता योग्य वेळी रुग्णालयात नेले जात नाही किंवा अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना व्यवस्थित न हाताळल्याने जखमी व्यक्तीच्या शरीरास अधिक इजा होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या करिता ह्यगोल्डन अवरह्ण मध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रुग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरित मिळण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस विभागातर्फे हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार आहे.महामार्ग अखत्यारितील महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल, पेट्रोल पंप, ढाबा किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्ग लगतचे गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना मृत्युंजय दूत नावाने संबोधण्यात येणार आहे. या देवदूत व्यक्तींना अपघातग्रस्त व्यक्तीस कसे हाताळावे किंवा कसे उचलावे याबाबतचे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येणार आहे.महामार्ग सुरक्षा पथकाकडून देणार ओळखपत्रेमहामार्ग तयारीतील राष्ट्रीय व राज्य महामार्ग नजीकच्या हॉस्पिटलची नावे पत्ते व संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका १०८ हा दूरध्वनी क्रमांक आहे. याबाबत माहिती देवदुतांना देऊन इतर खासगी व इतर रुग्णालय संलग्न असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूत यांना अपघात प्रसंगी मदत करताना कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी