शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूण पूरग्रस्त भागात मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

रत्नागिरी : चिपळूण व परिसरात पूरस्थितीमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले असून, घराघराला त्याची झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात ...

रत्नागिरी : चिपळूण व परिसरात पूरस्थितीमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले असून, घराघराला त्याची झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे प्रशासनाने सुचवलेल्या भागात अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. संस्थानचे सुमारे ५० कार्यकर्ते व रुग्णवाहिका या सेवेत सहभागी झाल्या आहेत. येथील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.

ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तिथे प्रशासनाच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन खिचडीची पाकिटे वाटण्यात आली. चिपळूणचे तहसीलदार डॉ. जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नदान करण्यात आले. पुरात अडकलेल्या काही लोकांची येथील सती हायस्कूलमध्ये निवाऱ्याची सोय केली आहे. तिथेही ही अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. तसेच सती नाका, पिंपळी समर्थनगर येथेही पाकिटे वाटली. रात्री उशिरापर्यंत असे वाटप करण्यात आले. संस्थानतर्फे सावर्डे येथे अन्न व पाकिटे तयार करण्यात आली. पूरग्रस्त भागात सुमारे ४०० अन्नाची पाकिटे वाटण्यात आली.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे ५० कार्यकर्ते व रुग्णवाहिका या सेवेत कार्यरत आहेत. अविनाश जागुष्टे, सुनील वीर, राजन बोडेकर, सुनील मोहिले, दिलीप मोहिरे, संतोष बिजीतकर, सिद्धेश रहाटे, आशिष शिवगण, प्रथमेश मोहिरे आदी या मदतकार्यात सहभागी झाले होते. या विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.

------------------

आज स्वच्छता माेहीम

चिपळूण परिसरातील पुराचे पाणी ओसरले असले, तरी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घरात, दुकानात, रस्त्यावर चिखलच चिखल पसरलेला आहे. हा चिखल वेळीच साफ करणे गरजेचे असल्याने जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे कार्यकर्ते रविवारी चिपळूणमध्ये दाखल हाेणार आहेत. याठिकाणी चिखल साफ करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मदतकार्यात सुमारे एक हजार कार्यकर्ते सहभागी हाेणार आहेत.

--------------------------------

चिपळूण येथे शुक्रवारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या कार्यकर्त्यांतर्फे अन्नाची पाकिटे वाटण्यात आली.