शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

By admin | Updated: July 12, 2014 00:33 IST

पडझड : भोपण खाडीत मृतदेह सापडला

रत्नागिरी : गेले दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यांत पडझडीच्या घटना घडल्या आहेत. भोपण (ता. दापोली) खाडीत आज, शुक्रवारी मृतदेह सापडला. डोर्ले (ता. रत्नागिरी) येथे विजेच्या तारेच्या धक्क्याने एक गाय मृत झाली आहे. देवरूख, संगमेश्वर, लांजा येथे वृक्ष कोसळला, तर दापोली, राजापुरात घरांचे नुकसान झाले. मंडणगडमध्येही दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भारजा व उपनद्यांमध्ये पाणी भरू लागले आहे.दापोली तालुक्यात एका घराचे अंशत: १ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यातील भोपण गावातील प्रदीप वेळणस्कर यांचा मृतदेह खाडीत सापडला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. देवरूख बाजारपेठेतील जुनाट वृक्ष कोसळल्याने एक रिक्षा, दोन मोटारसायकल आणि तब्बल दहा दुकानांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर येथील रिक्षा स्टँडजवळही जुनाट वृक्ष कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प होती.मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शेवरीचे झाड पडल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली. तसेच एक संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यातही घरागोठ्यांचे नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथे विजेच्या तारेच्या धक्क्याने एक गाय मरण पावली, तर राजापूर तालुक्यात ४ घरांचे अशंत: ३७ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे. मंडणगडमधील भारजा व उपनद्यांमध्ये दोन दिवसांच्या या मुसळधार पावसाने आताच पाणी भरू लागले आहे. (प्रतिनिधी)