शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पूल, साकव, मोऱ्यांची पडझड; रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ११६ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 14:19 IST

नुकसानाचा आकडा आणखी वाढू शकतो.

रत्नागिरी : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते, साकव, पूल आणि मोऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या नुकसानाचे एकूण मूल्य ११६ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्यारत्नागिरी आणि चिपळूण बांधकाम विभागांकडून या नुकसानाची माहिती जमवण्याचे काम सुरू आहे. अंदाजे हा नुकसानाचा आकडा आणखी वाढू शकतो.या वर्षी जिल्ह्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील आणि वाड्यांतील रस्ते नादुरुस्त होऊन त्यांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे, गोठे, साकव, मोऱ्या तसेच पूल यांचेही नुकसान झाले आहे. साकव, पूल आणि मोऱ्यांच्या नुकसानग्रस्ततेमुळे जिल्ह्यातील वाहतूकही प्रभावित झाली आहे. यामुळे नुकसानग्रस्त रस्ते, पूल, मोऱ्या आणि साकव यांच्या दुरुस्तीकरिता आवश्यक निधीचा एकत्र प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.सध्या जिल्ह्यातील ४३९ रस्ते दुरुस्त झाले आहेत. त्याचबरोबर ७२ साकव आणि ६९ मोऱ्या व पुलांचे नुकसान झाले आहे. त्यांना दुरुस्त करण्यासाठी ११६ कोटी ३९ लाख ८० हजार रुपयांची आवश्यकता आहे. अजूनही दुरुस्त झालेल्या रस्त्यांची, नुकसानग्रस्त साकव, मोऱ्या, पुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानाचा आकडा पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे.संपूर्ण नुकसानाची माहिती जमवण्यास काही दिवस लागतील. त्यानंतर एकूण झालेल्या नुकसानाचा आकडा तयार करून संबंधित प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला जाईल. मात्र, शासनाने या नुकसानग्रस्तांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधकामासाठी वेळेवर निधी देणे अत्यावश्यक आहे.

नुकसानग्रस्त - संख्या - आवश्यक खर्च (लाखात)

  • नादुरुस्त रस्ते - ४३९ - ८,६५६.८०
  • पूल व मोऱ्या - ६९  -१,२५३.००
  • साकव - ७२ - १,७३०.००            
  • एकूण - ५८० - ११,६३९.८०

रत्नागिरी बांधकाम विभाग

  • नुकसान - ४,४६६.३५ (लाखात)
  • चिपळूण बांधकाम विभाग
  • नुकसान - ७,१७३.४५ (लाखात)
English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Damage Bridges; Ratnagiri Zilla Parishad Suffers ₹116 Crore Loss

Web Summary : Ratnagiri district faces ₹116 crore loss due to heavy rains damaging roads, bridges, and culverts. 439 roads, 72 bridges, and 69 culverts are affected, requiring urgent repairs. Proposal for funds is being prepared; timely government aid is crucial.