रत्नागिरीत मुसळधार पाऊस,  आकाश फुटल्यासारखा गडगडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:14 PM2020-10-15T14:14:56+5:302020-10-15T14:22:41+5:30

rain, ratnagirinews गेले तीन दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी शहर परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून गडगडाटासह विजांच्या लखलखाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा मधून मधून खंडित होत आहे. काही भागात वीज पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

Heavy rain in Ratnagiri, thunder like the sky | रत्नागिरीत मुसळधार पाऊस,  आकाश फुटल्यासारखा गडगडाट

रत्नागिरीत मुसळधार पाऊस,  आकाश फुटल्यासारखा गडगडाट

Next
ठळक मुद्देरत्नागिरीत मुसळधार पाऊस, आकाश फुटल्यासारखा गडगडाट वीज पडून महिला ठार, २ जखमी

रत्नागिरी : गेले तीन दिवस परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. बुधवारी सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी शहर परिसरात आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून गडगडाटासह विजांच्या लखलखाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा मधून मधून खंडित होत आहे. काही भागात वीज पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अतिकमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने त्याचा परिणाम म्हणून आणखी काही दिवस मुंबई, ठाणेसह दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झालाय. त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही काळ मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यानंतर पाऊस थांबला तरी गडगडाट सुरूच आहे.

या वादळी पावसामुळे रत्नागिरी शहरात तसेच परिसरात काही ठिकाणी वीज कोसळण्याचे प्रकार घडले.भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. सर्व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे

वीज पडून महिला ठार, २ जखमी

देवरूख : मंगळवारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने संगमेश्वर तालुक्यात तुळसणी येथे विजेच्या धक्क्याने एक महिला मृत झाल्याची दुर्दैवी घटना घडली, तसेच मेघी सोलकरवाडी येथे वीज पडल्याने हसम कुटुंबातील दोनजण बेशुध्द पडले होते. या जखमींवर देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तालुक्यात मंगळवारी दुपारीच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तुळसणी येथे वीज पडली. येथील रियाना दिलावर मुकादम (४५) या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. याचवेळी कोसळलेल्या विजेच्या धक्क्याने मुकादम या बेशुध्द पडल्या. त्यांना तत्काळ देवरुखात प्रथम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सुत्रांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

तालुक्यातील मेघी सोलकरवाडी येथेही वीज कोसळली. ही वीज सागाच्या झाडावर पडल्याने झाड चिरले गेले आहे. या झाडाजवळ घर असलेल्या हसम कुटुंबियांना याचा धक्का बसला. कुटुंबातील संदीप जयराम हसम व पूजा दीपक हसम हे बेशुध्द पडले. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले. संदीप आणि पूजा हसम यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय सुत्रांनी दिली. हसम घरातील पाच लहान मुलांनाही किरकोळ धक्का बसला.

Web Title: Heavy rain in Ratnagiri, thunder like the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.