शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सावधान!, रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:37 IST

तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढण्याची शक्यता

रत्नागिरी : भारतीय हवामानशास्त्र विभागाने रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी 'उष्णतेच्या लाटेचा' इशारा दिला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावल्याने आणि जमिनीकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ ते ३२ अंशांवरून रत्नागिरीचे तापमान ३७-२८ मिलीमीटर इतके वाढणार असल्याची शक्यता आहे.सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. रत्नागिरीच्या तापमानात उच्चांकी वाढ होऊ लागली असून, तापमान ३८ अंशांपर्यंत जात आहे.पुढील ३ ते ४ दिवस उष्णतेची लाट तीव्र राहू शकते. रत्नागिरी किनारपट्टीचा भाग असल्याने हवेतील आर्द्रता जास्त असणार आहे. ज्यामुळे प्रत्यक्षातील तापमानापेक्षा उष्णतेची जाणीव (फील्स लाइक) अधिक त्रासदायक होणार आहे. अति उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन आरोग्यविषयक समस्या वाढणार आहेत. आताच उष्णतेच्या वाढलेल्या प्रमाणामुळे आणि दूषित हवामानामुळे तापसरी, खोकला, पित्ताचे विकार वाढत आहे.यापुढेही तापमानाचा पारा अधिकाधिक वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे. तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअस इतकी वाढ होणार असल्याने त्याचबरोबर आर्द्रतेतही वाढ होणार असल्याने यापुढे नागरिकांना या वातावरणाचा अधिक त्रास होणार आहे.घामाचे प्रमाणही वाढल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, त्वचेचे विकार, अति घामामुळे शरीरातील क्षारांचे प्रमाण कमी झाल्याने स्नायूंचे पेटके येणे यांसारख्या त्रासांमध्ये वाढ होणार आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 'हीट स्ट्रोक रूम' सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणती काळजी घ्यावी?

  • तहान लागलेली नसली, तरीही ठराविक अंतराने पाणी पीत राहा.
  • लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस (ORS) किंवा नारळ पाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचा आहारात समावेश करा.
  • हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा.
  • बाहेर जाताना डोके टोपीने किंवा रुमालाने झाकून घ्या.
  • घर थंड ठेवा : दिवसा खिडक्यांना पडदे लावा आणि रात्री तापमान कमी झाल्यावर खिडक्या उघड्या ठेवा. 

या गोष्टी टाळा

  • दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
  • उन्हाच्या वेळेत जड कामे किंवा व्यायाम करू नका.
  • मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेली पेये टाळा. कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते.
  • वाहनाचे अंतर्गत तापमान वेगाने वाढते. त्यामुळे पार्क केलेल्या वाहनात मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
  • जनावरांना सावलीत बांधा आणि त्यांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्या.
  • वाहने सावलीत ठेवा.
English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Alert: Konkan Coast, including Ratnagiri, Braces for Scorching Temperatures

Web Summary : Ratnagiri and the Konkan coast are under a heatwave alert. Temperatures are expected to rise significantly, with high humidity making conditions more oppressive. Residents are advised to stay hydrated, wear light clothing, and avoid strenuous activity during peak hours to prevent heatstroke and dehydration.