Accident: मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, एक ठार; राजापूर कोदवली नजीक झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:20 IST2022-04-22T13:19:39+5:302022-04-22T13:20:19+5:30
ओव्हरेटक करताना समोरून येणाऱ्या कंटेनरला कारची जोराची धडक. यात ते जागीच ठार झाले. तर पत्नी गंभीर जखमी झाली.

Accident: मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक, एक ठार; राजापूर कोदवली नजीक झाला अपघात
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली विज उपकेंद्राच्या समोर मालवाहू कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार चालक दिलीप भिकलिंग जंगम (वय-६५, रा. कुडाळ विठ्ठलवाडी) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी दिपाली जंगम (५४) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले आहे. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, कार चालक दिलीप जंगम हे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने निघाले होते. राजापूर कोदवली वीज उपकेंद्रानजीक आले असता महामार्गावर उभा असलेल्या कंटेनरला त्यांनी ओव्हरेटक केला. यावेळी समोरून गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला कारची जोराची धडक झाली. यात कार चालक दिलीप जंगम जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरिक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस कर्मचारी संदीप गुरव, चालक विश्वास बाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली.