अति घाईत मृत्यूच्या दारात पाय! रेल्वे थांबण्याआधीच उतरायला गेला अन् मरता मरता वाचला; रत्नागिरी स्थानकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:37 IST2025-08-30T15:37:21+5:302025-08-30T15:37:45+5:30
जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले

अति घाईत मृत्यूच्या दारात पाय! रेल्वे थांबण्याआधीच उतरायला गेला अन् मरता मरता वाचला; रत्नागिरी स्थानकातील घटना
रत्नागिरी : चालत्या गाडीतून उतरणे एका तरुणाच्या चांगलेच अंगाशी आले. उतरताना घसरून पडल्याने तो रेल्वेखाली जाणार होता. मात्र त्याचे नशीब बलवत्तर असल्याने त्याचा जीव वाचला. कोकण रेल्वेच्यारत्नागिरी स्थानकात आज शनिवारी मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली.
चालत्या ट्रेन मधून बेजबाबदारपणे उतरणारा तरुण खाली पडला आणि ट्रेन खाली जात होता. पण प्लॅटफॉर्मवर सेवेत असलेल्या दोन आर.पी.एफ जवानांच्या आणि एक विक्रेत्याच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
आज शनिवारी सकाळी एल टी टी - सावंतवाडी गाडी ६ वाजून ४१ मिनिटांनी रत्नागिरी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दाखल झाली. मात्र ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच यातील एका तरुणाने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला. या चुकीच्या प्रयत्नांत हा तरुण चालत्या ट्रेनच्या खाली येणार होता. पण तो पडताच प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन आर पी एफ जवानांनी आणि एका विक्रेत्याने सतर्कता दाखवत त्याला वेगाने बाजूला ओढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
कोकण रेल्वेचा आर.पी.एफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल तसेच विक्रेता वीर सिंग यांनी त्याला वेळीच ओढत ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले. त्याच्या बरोबर प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहिती नुसार हा तरुण गोळप रत्नागिरी येतील असल्याची माहिती पुढे आली आहे. या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकाने तत्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
प्लॅटफॉर्म वर कार्यरत दोन आर पी एफ व विक्रेत्यांनी समय सूचकता दाखवत केलेल्या हालचालीमुळे केवळ त्याचे प्राण वाचले. या घटनेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांचे ही विशेष कौतुक केले आहे. संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तत्काळ त्यांना प्रदान करण्यात आले आहे.
रत्नागिरी: चालत्या गाडीतून उतरणे एका तरुणाच्या चांगलेच अंगाशी आले. उतरताना घसरून पडल्याने तो रेल्वेखाली जाणार होता. मात्र त्याचे नशीब बलवत्तर असल्याने त्याचा जीव वाचला. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात शनिवारी (30 ऑगस्ट) मोठी दुर्दैवी घटना सुदैवाने टळली.#Railway#maharashtra… pic.twitter.com/tOmsxnjMIM
— Lokmat (@lokmat) August 30, 2025