Ganpatipule: अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या चरणी 'हापूस'चा मोरया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:29 IST2022-05-03T19:18:59+5:302022-05-03T19:29:11+5:30

अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर ‘श्रीं’च्या मंदिरात गर्भगृहात ‘श्रीं’चे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी हापूस आंब्याची आरास केली हाेती.

Hapus mango decoration in the temple of Shree at Shrikshetra Ganpatipule | Ganpatipule: अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या चरणी 'हापूस'चा मोरया

Ganpatipule: अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या चरणी 'हापूस'चा मोरया

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील ‘श्रीं’च्या मंदिरात अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी हापूस आंब्याची आरास करून आम्र पूजा केली.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘श्रीं’च्या मंदिरात गर्भगृहात ‘श्रीं’चे मुख्य पुजारी अमित प्रभाकर घनवटकर यांनी हापूस आंब्याची आरास केली हाेती. रत्नागिरी येथील आंबा व्यावसायिक सिद्धेश वैद्य यांच्या माध्यमातून ही पूजा साकारण्यात आली हाेती. ‘श्रीं’च्या मंदिरात केलेल्या आंब्याच्या आरासमुळे विलाेभनीय दृश्य दिसत हाेते. ‘श्रीं’चे आम्रयुक्त पूजेचे दुर्मीळ दृश्य भक्तांना पाहायला मिळाले.

Web Title: Hapus mango decoration in the temple of Shree at Shrikshetra Ganpatipule