शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

गुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:00 PM

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

ठळक मुद्देगुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्पगणपतीपुळे परिसराला फटका, रस्ता खचल्याने अनेक मार्ग बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.सोमवारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडले असून, नदी, नाल्यांना पाणी आले आहे. राजापुरातील अर्जुना नदीपात्राला पूर आल्याने पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. रात्री हे पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरू लागल्याने व्यापाऱ्यांनी रात्रीच दुकानातील सर्व माल इतरत्र हलविण्यास सुरूवात केली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले होते.गेल्या आठवड्यात गुहागर तालुक्यातील भातगाव रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प आहे. देवरूख साटवली येथे देखील रस्ता खचला आहे. खेड तालुक्यातील विराचीवाडी, वेरळ, सुकिवली - भास्ते, ओक्रवाडी, शेल्डी या भागात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

तालुक्यातील रघुवीर घाटात सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने दरड कोसळल्याने वाहतूक बंद पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही दरड बाजूला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. गुहागर - चिपळूण मार्गावर सोमवारी झाड पडल्याने वाहतूक बंद पडली होती. हे झाड बाजूला करण्यात आले असून, या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये - मजगाव रस्ता खचल्याने सोमवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर धामणंद - नेवरे मार्गावर रस्ता खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील सोलगाव - बौद्धवाडी - बाणेवाडी रस्त्याच्या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी