शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ डांबर प्लांटबद्दल ग्रामपंचायत सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

आवाशी : माणी (ता. खेड) येथे विनापरवाना सुरु असलेल्या ‘त्या’ डांबर प्लांटबद्दल आता ग्रामपंचायत सदस्यच आक्रमक झाले आहेत. हा ...

आवाशी : माणी (ता. खेड) येथे विनापरवाना सुरु असलेल्या ‘त्या’ डांबर प्लांटबद्दल आता ग्रामपंचायत सदस्यच आक्रमक झाले आहेत. हा प्लांट बंद ठेवणे गरजेचे असतानाही तेथे कामकाज सुरु असल्याने या सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे.

खेड तालुक्यातील माणी गावच्या हद्दीत बौद्धवाडीनजीक खेड सवेणी - माणी - लवेल जिल्हा परिषद रस्त्याकडेला मागील वीस वर्षांपासून हा प्लांट सुरु आहे. क्रशर व डांबर प्लांटला ग्रामपंचायतीसह अन्य शासकीय यंत्रणांची परवानगी नसतानाच तो खुलेआम सुरु ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गाव परिसराचे पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या प्लांटबाबत गावचे ग्रामस्थ शत्रुघ्न उर्फ बंटी आंब्रे व अशोक आंब्रे यांनी आक्षेप घेतला होता. ग्रामस्थांच्या मते या प्लांटला ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला नसताना प्लांट व क्रशर कसे काय सुरु आहेत. त्याचबरोबर प्लांट व क्रशरसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला, आरोग्य विभाग व जिल्हा परिषद यांचीही परवानगी नसताना तेथे कामकाज कसे काय सुरु आहे. याचबरोबर जागा ही बिनशेती नसताना तेथे अनधिकृत १७ खोल्यांचे बांधकाम कुणाच्या परवानगीने केले, असे आक्षेप घेतले आहेत.

सर्व शासकीय बाबींची पूर्तता केल्याखेरीज प्लांट सुरु न करण्याचे आदेश बजावले आहेत. मात्र, बंदचे आदेश असतानाही वा वरील कोणत्याही बाबींची पूर्तता न करताच मागील चार दिवसांपासून येथे खडी साठविण्याचे काम कुणाच्या परवानगीने सुरु केले, अशी विचारणा ग्रामपंचायत सदस्य राजेश सागवेकर व अरविंद गमरे यांनी ग्रामपंचायतीमध्ये केली आहे. खडी घेऊन आलेल्या दोन डंपरना तेथे खडी उतरविण्यास विरोध केला. त्याचबरोबर दोन सदस्यांनी प्रसारमाध्यमांना बोलावून वस्तुस्थिती कथन केली. त्यानुसार ग्रामसेवक लहू कदम, सरपंच राकेश शिंदे यांना प्रसारमाध्यमांसमोर याची विचारणा केली. मात्र, याचे सविस्तर उत्तर देण्यास सरपंच व ग्रामसेवकांनी असमर्थता दर्शवली. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या चर्चेनुसार ग्रामसेवक व सरपंच कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असून, यापूर्वी सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही विसंगती असल्याचे सदस्य राजेश सागवेकर व अरविंद गमरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच ग्रामसेवक व सरपंच हे राहुल कन्स्ट्रक्शन या कंपनीला पाठीशी घालत असून, जोपर्यंत ग्रामसभा होत नाही, तोपर्यंत प्लांट सुरु करण्यास परवानगी न देण्याचे त्यांनी बजावले आहे.