शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजनांना हवाय कोटीचा निधी

By admin | Updated: January 20, 2015 00:08 IST

जिल्हा परिषद : २९ गावांसाठी हवेत १ कोटी १२ लाख

रत्नागिरी : जिल्ह्यातील २९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजना नादुरुस्त झाल्या आहेत़ त्यासाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करावा लागणार आहे़ बंद योजनांमुळे उन्हाळ्यामध्ये या गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे़कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत़ या योजनांमुळे अनेक गावातील हजारो लोकांच्या घरापर्यंत पाणी नेण्यात यश आले होते़ त्याचा फायदा उन्हाळ्याच्या दिवसांत उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या कालावधीत मोठा होतो़ जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही पाणी साठविण्याचे नियोजन नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिवसेना - भाजपाच्या युतीच्या कालावधीत जिल्ह्यात अनेक गावांमध्ये नळपाणी योजना राबवण्यात आल्या होत्या. या योजनामुळे डोंगराळ भागातील गावातील वाड्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले होते़ मात्र, त्या योजनांची वेळीच डागडुजी व दुरुस्ती करण्यात न आल्याने त्याचा फटका आता लोकांना बसत आहे़या योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्या नादुरुस्त झाल्या असल्याने आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते़ त्यासाठी नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती होणे आवश्यक आहे़ नादुरुस्त योजनांमुळे २९ गावांतील हजारो लोकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. जिल्ह्यातील २९ गावांना पाणी पुरवठा करण्याऱ्या नळपाणी योजना नादुरुस्त झाल्या आहेत़ या योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये खर्च करावा लागणार आहे़ त्याबाबतचा प्रस्तावही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे़ तो लवकरच जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे़ (शहर वार्ताहर)