चार वर्षाच्या पोटच्या चिमुकलीला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 14:06 IST2022-01-01T14:05:47+5:302022-01-01T14:06:08+5:30
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

चार वर्षाच्या पोटच्या चिमुकलीला बेदम मारहाण, उपचारदरम्यान मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल
रत्नागिरी : चार वर्षांच्या पोटच्या चिमुकलीला केलेल्या मारहाणीत तीचा दुर्देवी मृत्यू झाला. तालुक्यातील बाणकोट येथे ही घटना घडली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, बाणकोट येथील ईलीयास खेडेकर हे आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांना चार वर्षाची एक मुलगी आहे. खेडेकर यांनी चार दिवसांपूर्वी या चिमुकलीला काही किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. यावेळी मुलीला ठकलुन दिले असता तिचे डोके भिंतीवर आपटले. यात तीला जबर दुखापत झाली.
तीला उपचारासाठी प्रथम डेरवण येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तीला रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास तिचे निधन झाले. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.