संगमेश्वरात टेम्पो दरीत कोसळून अपघात, चारजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:35 IST2017-12-05T17:29:07+5:302017-12-05T17:35:08+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड येथील अवघड वळणाजवळ पिकअप टेम्पो दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी झालेल्या सुरेश गौतम, शब्बीर खान, मायाराम घसीटे व चालक मोहम्मद सावंत यांना दरीतून बाहेर काढण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड येथील अवघड वळणाजवळ पिकअप टेम्पो दरीत कोसळला.
देवरूख (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड येथील अवघड वळणाजवळ पिकअप टेम्पो दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोहम्मद अक्रम सावंत (४०, रा. गोवंडी, मुंबई) हा आपल्या ताब्यातील पिकअप टेम्पो घेऊन गोवा ते मुंबई असा प्रवास करीत होता. हा टेम्पो संगमेश्वर येथील रामकुंड येथे आला असता चालक मोहम्मद याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व टेम्पो थेट दरीत जाऊन कोसळला.
हा अपघात घडला तेव्हा संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबरीश आगाशे हे ग्रामीण रूग्णालयात येत होते. त्यांनी तत्काळ जगदगुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेचे चालक प्रसाद सप्रे व १०८ रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. आगाशे, सपे्र व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी झालेल्या सुरेश गौतम, शब्बीर खान, मायाराम घसीटे व चालक मोहम्मद सावंत यांना दरीतून बाहेर काढण्यात आले.