कर्नाटकातील मासेमारी नौका गस्ती पथकाकडून ताब्यात, रत्नागिरी समुद्रात मध्यरात्री रंगला थरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:15 IST2025-01-10T16:15:10+5:302025-01-10T16:15:37+5:30

रत्नागिरी : कर्नाटकातील मलपी येथील रत्नागिरीच्या समुद्रात अतिक्रमण करणाऱ्या नौकेला गस्ती नौकेने ताब्यात घेतले. ही नौका ताब्यात घेत असताना ...

Fishing boat from Karnataka seized by patrol team, midnight terror in Ratnagiri sea | कर्नाटकातील मासेमारी नौका गस्ती पथकाकडून ताब्यात, रत्नागिरी समुद्रात मध्यरात्री रंगला थरार 

कर्नाटकातील मासेमारी नौका गस्ती पथकाकडून ताब्यात, रत्नागिरी समुद्रात मध्यरात्री रंगला थरार 

रत्नागिरी : कर्नाटकातील मलपी येथील रत्नागिरीच्या समुद्रात अतिक्रमण करणाऱ्या नौकेला गस्ती नौकेने ताब्यात घेतले. ही नौका ताब्यात घेत असताना इतर परप्रांतीय नौकांनी गस्ती नौकेला घेरले. गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर स्थानिक मच्छीमार आणि पोलिस गस्ती नौकेच्या मदतीला धावले. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास समुद्रात हा थरार घडला.

मासेमारी नौकांनी अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून ८ जानेवारी रोजी रात्री समजताच जिल्ह्याची गस्ती नौका गोळप-पावस या दिशेने रवाना झाली. बुधवारी रात्री सुमारे ११ ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान मलपी येथील ३५/४० हायस्पीड ट्रॉलर नौका निदर्शनास आल्या. या नौकांचा पाठलाग करताना ‘अधिरा’ (IND-KL-०२-MM५७२४) या नौकेचा ताबा गस्ती नौकेने घेतला. त्यामुळे इतर नौकांनी गस्ती नौकेला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच पकडलेल्या नौकेवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

इतर नौकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी ही बाब मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणताच आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली. ही बाब स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास येताच आठ ते दहा मासेमारी लोकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलिस बळ उपलब्ध करून मिरकरवाडा येथील नौकेवरून पाठवण्यात आले.

मलपी येथील नौकांनी गस्ती नौका मार्गक्रमण करीत असल्याचे पाहताच नौकेवरील दोऱ्या समुद्रात सोडल्या त्यातील दोरी गस्ती नौकेच्या फॅनमध्ये अडकल्याने गस्ती नौका जागेवर बंद पडली. गस्ती नौका बंद पडल्यामुळे इतर नौकांनी हल्ला करण्याचा प्रसंग जीवावर बेतणारा होता; मात्र स्थानिक नौकांची मदत, अतिरिक्त पोलिसांची कुमक या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात आल्या. या नौकेवर दावा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Fishing boat from Karnataka seized by patrol team, midnight terror in Ratnagiri sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.