Ratnagiri: राजापुरात नगराध्यक्ष निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:59 IST2025-11-12T15:58:24+5:302025-11-12T15:59:06+5:30

Local Body Election: महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील चर्चा अजूनही सुरूच असल्याने उमेदवारी याद्या जाहीर झालेल्या नाहीत

First application filed for the mayoral election in Rajapur | Ratnagiri: राजापुरात नगराध्यक्ष निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल

Ratnagiri: राजापुरात नगराध्यक्ष निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल

राजापूर : राजापूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एक अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा उमेदवारी अर्ज ज्योती सुनील खटावकर, अपक्ष ( हिंदू महासभा) यांच्यावतीने दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी अन्य अर्ज दाखल झालेले नाहीत.

राजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. पहिल्या दिवशी नगरसेवक अथवा नगराध्यक्ष पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दुसऱ्या दिवशी केवळ नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एक अर्ज आला. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील चर्चा अजूनही सुरूच असल्याने उमेदवारी याद्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे अजूनही कोणाचे अर्ज आलेले नाहीत. येत्या एक दोन दिवसात ही नावे जाहीर होणे अपेक्षित आहे.

Web Title : रत्नागिरी: राजापुर में नगराध्यक्ष चुनाव के लिए पहला नामांकन दाखिल

Web Summary : राजापुर नगर परिषद के नगराध्यक्ष चुनाव के लिए पहला नामांकन ज्योति सुनील खटावकर ने स्वतंत्र उम्मीदवार के तौर पर दाखिल किया। गठबंधन के भीतर चर्चा जारी है, जिससे उम्मीदवार सूची की घोषणा में देरी हो रही है। जल्द ही और नामांकन आने की उम्मीद है।

Web Title : Ratnagiri: First Nomination Filed for Rajapur Mayor Election

Web Summary : The first nomination for Rajapur Nagar Parishad's mayoral election was filed by Jyoti Sunil Khatavkar, an independent candidate. Discussions within alliances continue, delaying candidate list announcements. More nominations are expected soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.