रत्नागिरी : पंधरा दिवसच मिळणार रेशन दुकानात धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 16:26 IST2018-08-01T16:23:55+5:302018-08-01T16:26:00+5:30
रेशनवर पूर्वी महिनाअखेरपर्यंत धान्य मिळत होते. मात्र, आता १ ते १५ तारखेपर्यंतच धान्याचे वितरण होणार आहे. यानंतर उरलेले धान्य पुरवठा विभागाकडे जमा होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांना वेळेतच धान्य घेऊन जावे लागणार आहे.

रत्नागिरी : पंधरा दिवसच मिळणार रेशन दुकानात धान्य
चिपळूण : रेशनवर पूर्वी महिनाअखेरपर्यंत धान्य मिळत होते. मात्र, आता १ ते १५ तारखेपर्यंतच धान्याचे वितरण होणार आहे. यानंतर उरलेले धान्य पुरवठा विभागाकडे जमा होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांना वेळेतच धान्य घेऊन जावे लागणार आहे.
शासन सध्या धान्य वितरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अनेक निर्णय घेत आहे. यामध्ये पॉस मशिनद्वारे धान्य वितरण हा महत्त्वाचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यावर पर्याय काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
१ ते १५ तारखेपर्यंत धान्य वितरण होणार आहे. यानंतर धान्य वितरण होणार नाही. चालू महिन्यातच पुढील महिन्याच्या धान्य उचलसाठी रेशनदुकानदारांना कार्यवाही करावी लागणार आहे.