लोटेतील दुर्गा केमिकल कंपनीत भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:48 IST2021-01-13T18:46:38+5:302021-01-13T18:48:30+5:30

Fire Chiplun Ratnagiri- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा केमिकल या कंपनीत बुधवारी सायंकाळी ३.३० वाजता अचानक भीषण आग लागली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Fierce fire at Durga Chemical Company in Lotte | लोटेतील दुर्गा केमिकल कंपनीत भीषण आग

लोटेतील दुर्गा केमिकल कंपनीत भीषण आग

ठळक मुद्देलोटेतील दुर्गा केमिकल कंपनीत भीषण आगचिपळूण नगर परिषदच्या अग्निशमन दलाला पाचारण

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दुर्गा केमिकल या कंपनीत बुधवारी सायंकाळी ३.३० वाजता अचानक भीषण आग लागली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीत औषध निर्मिती करणाऱ्या दुर्गा केमिकल कंपनीतील रियाकटरला अचानक आग लागली. एका पाठोपाठ एक स्फोट होत होते. त्यामुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली.

घटनास्थळी तत्काळ औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब दाखल झाला होता. त्यानंतर खेड नगर परिषद व चिपळूण नगर परिषदच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत एबी मोहरी कंपनीलगत दुर्गा केमिकल ही कंपनी आहे. या आगीची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

Web Title: Fierce fire at Durga Chemical Company in Lotte