रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, मनाेरुग्णालयातील कर्मचाऱ्याला सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 17:44 IST2023-04-21T17:42:45+5:302023-04-21T17:44:31+5:30

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. मेघना नलावडे यांनी १७ साक्षीदार तपासले.

Extreme incident on a minor girl rigorous imprisonment for a mental hospital employee | रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, मनाेरुग्णालयातील कर्मचाऱ्याला सश्रम कारावास

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, मनाेरुग्णालयातील कर्मचाऱ्याला सश्रम कारावास

रत्नागिरी : उपप्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सलग ५ महिने अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला हाेता. याप्रकरणी तेथील शिपाई कर्मचाऱ्याला न्यायालयाने दाेषी ठरविले असून, मंगळवारी (१८ एप्रिल) २० वर्षे सश्रम कारावास आणि ३१,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सचिन दिलीप माने (३८, रा. मनोरुग्णालय वसाहत जेलरोड, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. यातील पीडित मुलगी बाल कल्याण समितीच्या आदेशाने प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आली होती. तिची काळजी घेण्यासाठी तिच्या आईलाही दवाखान्यात तिच्या सोबत ठेवण्यात आले होते. सचिन माने याने पीडितेच्या आईशी ओळख वाढवून तिला मुद्दाम कुठेतरी गुंतवून ठेवत असे तसेच जेवण वगैरे आणायला जा, असे सांगून पीडितेवर वारंवार अतिप्रसंग करत होता.

दरम्यान, पीडितेने याबाबत आपल्या आईला सांगितले. आईने जिल्हा बालकल्याण समितीकडे धाव घेतल्यानंतर जिल्हा बालकल्याण समितीने याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पत्र दिले. त्यानुसार शहर पोलिस स्थानकात सचिन माने विरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६ २ (बी), पोक्सो ३/४ (२), ६ पोक्सो ११/१२ आणि बाल न्याय अधिनियमानुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. मेघना नलावडे यांनी १७ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला ए. राऊत यांनी आरोपी सचिन मानेला २० वर्षे सश्रम कारावास आणि ३१,५०० रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काॅन्स्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.

Web Title: Extreme incident on a minor girl rigorous imprisonment for a mental hospital employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.