शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

दुसऱ्यासमोर व्यक्त व्हा, पण आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र याचीही तितकीच काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 7:27 PM

आवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू आहे. आपल्या भावना दुसऱ्यासमोर व्यक्त करण्याचे ते एक उत्तम साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवाजावरून त्याच्या मनातील भावना व्यक्त होत असतात. म्हणून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र याची काळीजीही तितकीच घ्यायला हवी, असे मत डॉ. शमा कोवळे या व्यक्त करतात.

ठळक मुद्देआवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू, दुसऱ्यासमोर व्यक्त व्हाआवाजाचे माध्यम, स्वरयंत्र याचीही तितकीच काळजी घ्या

शोभना कांबळेरत्नागिरी : आवाज हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू आहे. आपल्या भावना दुसऱ्यासमोर व्यक्त करण्याचे ते एक उत्तम साधन आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवाजावरून त्याच्या मनातील भावना व्यक्त होत असतात. म्हणून व्यक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आवाजाचे माध्यम, स्वरयंत्र याची काळीजीही तितकीच घ्यायला हवी, असे मत डॉ. शमा कोवळे या व्यक्त करतात.गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील एका प्रख्यात रूग्णालयात त्या स्वरयंत्र तंत्रज्ञ तसेच नाक, कान, घसातज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसं पाहील तर सामान्य नागरिकांनी आपल्या आवाजाची काळजी घ्यायलाच हवी, पण गायक, निवेदक, अभिनेता, वक्ता, शिक्षकवर्ग आदी व्यवसायासाठी आपल्या आवाजाचा उपयोग करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी.

या मंडळींना आवाजात वारंवार चढ-उतार करावे लागतात. आपल्या आवाजाची तीव्रता स्वरपेटीच्या स्पंदनावर ठरते. मोठ्या आवाजासाठी स्पंदनाची तीव्रता वाढवावी लागते, परिणामी स्वरपेटीवर त्याचा परिणाम होत राहतो. बरेचदा आपण आपल्या आवाजाशी संबंधीत आजाराकडे दुर्लक्ष करतो. आवाज बसण्याची समस्या अनेकांना जाणवते. कधी सर्दी, थायरॉईड यांसारखे आजार तर कधी मर्यादेपेक्षा उच्च स्वरात ओरडल्यानेही आवाज बसू शकतो.प्रत्येकवेळी आपण आवाजाकडे लक्ष देतोच, असे नाही. त्रास होऊ लागला तर घरगुती उपाय करतो. आवाज चांगला राहावा, आवाजातील बदलाला कसे सामोरे जावे, याचेही एक शास्त्र आहे. ते माहित व्हावे, यादृष्टीने काळजी घ्यावी लागते. व्यवस्थित काळजी घेऊनही आवाजात दोष आढळत असतील किंवा वारंवार त्रास उद्भवत असतील तर स्वरतज्ज्ञांचा सल्ला घ्यायलाच हवा.आवाजाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्वरयंत्रआपल्या आवाजाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वरयंत्र. सर्वसाधारणपणे आवाज तयार होण्याची प्रक्रिया तीन भागात होते. पहिली स्वरयंत्र, दुसरी फुफ्फुसे आणि तिसरी जीभ, गाल, टाळा, ओठ आदी. जेव्हा फुफ्फुस पुरेशी हवा पंप करते, तेव्हा स्वरपेटी स्पंदन पावते आणि आवाज तयार होतो. स्वरयंत्रातील दुसरे स्नायू ताण, तीव्रता कमी करतात व तो आवाज गाळून बाहेर पोचवतात. 

कोणत्याही व्यक्तिचा आवाज त्या व्यक्तीचे वय, त्याच्या भावना, लिंग सांगू शकतात. उदा. स्त्रीचा आवाज बारीक असतो, रडताना आवाजात कंप येतो. व्यावसायिक याच तंत्राचा वापर करून आवाजामध्ये चढ - उतार आणू शकतात. आपला आवाज किती आणि कसा वापरायचा, हे स्वरपेटी ठरवत असते. ज्याना आवाजातील चढ-उतार कसे करायचे, हे काळात नाही त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतले जाते. व्यावसायिक या तंत्राचा वापर करून आवाजात चढ-उतार करीत असतात आपण आपला आवाज किती आणि कसा वापरायचा, आपली स्वरपेटी किती उघड झाप करायची, हे ठरवू शकतो. व्यावसायिक आवाजाचा वापर करणारे हे तंत्र वापरतात. ज्यांना आवाजात चढ-उतार करता येत नाही, त्यांच्यासाठी व्हाईस मॉड्यूलेशनचे विशेष प्रशिक्षण उपलब्ध आहे.- डॉ. शमा कोवळे,स्वरयंत्रतज्ज्ञ

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHealth Tipsहेल्थ टिप्स