चिपळूण : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी चिपळुणात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात काय बोलणार, याबाबत चिपळूणकरांना उत्सुकता होती. मात्र, त्यांनी कोणत्याही राजकीय मुद्द्याला स्पर्श न करता व ऐन निवडणुकीत विरोधकांवरील टीकेला बगल दिल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात रविवारी दुपारी ही सभा पार पडली. यावेळी उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उमेश सकपाळ व पदाधिकारी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रचार सभेत विरोधकांवर फारशी टीका न करता आजवर केलेल्या कामांचाच आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री असताना केलेली काम यावेळी त्यांनी अधोरेखित केली. या व्यतिरिक्त त्यांनी विराेधकांच्या टीकेवर काेणतेच भाष्य केले नाही.
Web Summary : In Chiplun, Deputy Chief Minister Eknath Shinde avoided political jabs during a rally for the municipal elections. He focused on past accomplishments as Chief Minister, surprising attendees by not directly addressing opposition criticisms. The event saw attendance by ministers and local leaders.
Web Summary : चिपलूण में, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने नगरपालिका चुनावों के लिए एक रैली के दौरान राजनीतिक कटाक्षों से परहेज किया। उन्होंने मुख्यमंत्री के रूप में पिछली उपलब्धियों पर ध्यान केंद्रित किया, विपक्ष की आलोचनाओं को सीधे तौर पर संबोधित नहीं करके उपस्थित लोगों को आश्चर्यचकित कर दिया। कार्यक्रम में मंत्रियों और स्थानीय नेताओं ने भाग लिया।