शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग अंधारात

By admin | Updated: July 31, 2014 23:22 IST

जिल्हा परिषद : वीजपुरवठा तोडल्याने काळोखात काम करण्याची वेळ

रत्नागिरी : तीन महिन्यांचे २८ हजार रुपयांचे विजेचे बिल थकल्याने जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने खंडित केला. त्यामुळे कर्मचारी आंधारात काम करीत आहेत.परिषद भवनाच्या आवारामध्ये लायब्ररी इमारत म्हणून नोंद असलेल्या दुमजली इमारतीमध्ये माध्यमिक शिक्षण विभाग, जलस्वराज विभाग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांची कार्यालये आहेत. माध्यमिक विभागामध्ये जिल्हाभरातून शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षक आणि इतर लोकांची सतत वर्दळ असते.वीजबिल न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची मोहीमच महावितरणने हाती घेतली आहे.त्यातून शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांची कार्यालयेही सुटलेली नाहीत. दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी पंचायत समितीचा वीज पुरवठा तोडण्यात आला होता. मात्र, वीजबिल भरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. ही मोहीम शालेय पातळीवर राबवण्यात आल्यानंतर आता महावितरणने आता वक्रदृष्टी माध्यमिक शिक्षण विभागाकडे वळवली आहे. शिक्षण विभागावरही कारवाई केली असून त्यामुळे या विभागाचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे.माध्यमिक शिक्षण विभागाच्या इमारतीचे मार्चनंतरचे तीन महिन्यांचे वीजबिल भरलेले नाही. तीन महिन्यांचे वीजबिल २८ हजार २१० एवढे आहे. ते भरण्याबाबत महावितरणकडून जिल्हा परिषदेला वेळोवेळी सूचना देण्यात आली होती. मात्र, हे वीजबिल भरण्याची मुदत संपल्यानंतर अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लायब्ररी इमारतीचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे काल सायंकाळपासून माध्यमिक शिक्षण विभाग, जलस्वराज विभाग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हे तिन्ही विभाग आंधारात आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांना आंधारात चाचपडत काम करावे लागत आहे. त्यातच पावसाळा असल्याने वीजेची गरज असताना त्याचवेळी हा पुरवठा तोडण्यात आल्याने काम करायचे कसे? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे. (शहर वार्ताहर)मार्च महिन्यानंतर शिक्षण संचालक कार्यालयाकडून आकस्मिक निधी आलेला नाही. त्यामुळे वीजबिल भरणा करण्यासाठी आपल्या विभागाकडे इतर कोणताही निधी नसल्याने वीजबिल थकीत आहे.- आर. एस. अहिरे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग