शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

रत्नागिरीच्या हापूस, काजू, मत्स्योत्पादनाचं तुटीचं अर्थकारण

By admin | Updated: March 23, 2015 00:33 IST

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे

मेहरून नाकाडे-रत्नागिरी  --पर्यावरणातील असमतोलामुळे दिवसेंदिवस हवामानावर विपरित परिणाम होत आहे. पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबर अवेळी पाऊस पडणे, तसेच नीचांकी तापमान व उच्चांक तापमानाचा सामना करावा लागत आहे. हवामानात सातत्याने होणारे बदलही जाणवू लागले आहेत. आंबा, काजूबरोबर जिल्ह्याचे मुख्य अर्थकारण मासेमारीवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. माशांच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, नुकत्याच होऊन गेलेल्या अवकाळी पावसामुळे ४२ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक धोक्यात आले आहे. शिवाय जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ५० हजार ९७६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले आहे. हवामानावर अवलंबून असलेल्या पिकांवर परिणाम होत असलेला दिसून येत आहे. अवेळचा पाऊस वगळता तापमान १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा खाली आले तर फळ गळण्याबरोबर ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान वाढल्यावर आंबा भाजतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. फयान वादळानंतर गेली चार ते पाच वर्षे वातावरणात सातत्याने बदल दिसून येत आहेत. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा मे मध्ये पाऊस पडल्याने आंबापिकाचे मोठ्या प्रमाणार नुकसान होते. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा जोरदार तडाखा बसला होता. गतवर्षी काजूचे १ लाख ४ हजार ८४७ मेट्रीक टन काजू उत्पादन प्राप्त झाले होेते. यावर्षी अवकाळी पावसामुळे ६१.२० टक्के नुकसान झाल्याने यावर्षी काजू उत्पादन घटले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे १५७ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनारपट्टीवरील १०४ गावांतील १४ हजार ८१६ कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात मच्छी उतरवणारी ४८ केंद्र आहेत. सुरमई, पापलेट, सरंगा आदी माशांच्या पैदासीवर परिणाम झाल्याने उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यातील तीन महिने मच्छिमारी बंद असली तरी उर्वरित नऊ महिने मासेमारी सुरू असते. मात्र, वादळी वारे किंवा हवामानातील बदलामुळे त्यावेळी मासेमारी बंद ठेवावी लागते. मात्र, संपूर्ण हंगामात मासेमारी कमी अधिक प्रमाणात सुरू असते. गेल्या पाच वर्षात मत्स्य उत्पादनातही घट झाल्याचे दिसून येत आहे. २००५-०६ मध्ये एक लाख ५ हजार ६९ मेट्रीक टन, २००६-०७ मध्ये एक लाख ९ हजार ५५ मेट्रीक टन, २००७-०८ मध्ये ८५ हजार ०९९, २००८-०९ मध्ये ७२ हजार १२२, २००९-१० मध्ये ७५ हजार १२२ मेट्रीक टन, २०१०-११ मध्ये ९५ हजार ९५० मेट्रीक टन, २०११-१२ मध्ये ८८ हजार ४३८ मेट्रीक टन, २०१२-१३ मध्ये ८७ हजार ६९० मेट्रीक टन उत्पादन मिळाले आहे. २०१३-१४ मध्ये १ लाख ६६५३ मेट्रीक टन उत्पादन मिळाले होते. गतवर्षी तारली माशामुळे मच्छिमार बांधवांचा जेमतेम खर्च निभावू शकला होता.गेल्या काही वर्षात पाऊस जूनमध्ये सुरू झाला तरी सातत्य नसते शिवाय तो अवेळी कधीही पडतो. आॅक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरपासून सुरू होणारी थंडी उशीरा सुरू होते. त्याचप्रमाणे १७ ते १८ अंश सेल्सियसपेक्षा तापमान खाली येत आहे. फेब्रुवारी, मार्चपर्यत थंडी पडत असते. वास्तविक होळीनंतर हवामानात बदल होतो. मे महिन्यात ३४ ते ३५ अंश सेल्सियस इतके तापमान असते. परंतु सध्या तर मार्चमध्येच हे तापमान अनुभवण्यास मिळत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हाच येथील आंबा, काजू किंवा मत्स्य उत्पादनावर परिणाम करणारा आहे. बेसुमार होणारी वृक्षतोड तसेच कारखानदारी यामुळे हवामानातील बदलावर परिणाम होत आहे. वास्तविक ६९ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना केवळ ३८ टक्के इतकेच आहे. पाऊसदेखील ठराविक कालावधीने पडत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे.- डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी कुलगुरू, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली